BMC Election: बी. काॅम पास शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला! एबी फॉर्म दिला नाही, थेट कलर झेरॉक्स जोडली, निवडणूक आयोगाने सुद्धा चक्क ग्राह्य धरली!
BMC Election: हायुतीमध्ये उमेदवारीवरून सुरू असलेला संघर्ष रस्त्यावर आला. काहींनी छाती बडवून घेतली, काहींना अश्रू अनावर झाले, तर काहींनी एबी फॉर्म असलेल्या गाड्यांचा सुद्धा पाठलाग केला अशी स्थिती होती.

BMC Election: राज्यात महायुतीमध्ये महानगरपालिका निवडणुकींसाठी युती करण्यावरून तसेच उमेदवारांना एबी फॉर्म देण्यासाठी शेवटपर्यंत ताटकळत ठेवल्याने झालेला रणकंदन अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. यामुळे महायुतीमध्ये उमेदवारीवरून सुरू असलेला संघर्ष रस्त्यावर आला. काहींनी छाती बडवून घेतली, काहींना अश्रू अनावर झाले, तर काहींनी एबी फॉर्म असलेल्या गाड्यांचा सुद्धा पाठलाग केला अशी अभूतपूर्व परिस्थिती एका बाजूला झाली असतानाच मुंबईतील भाजप उमेदवारानं मात्र उमेदवारी मिळण्यासाठी अक्षरशः टोक गाठल्याचा प्रकार घडला.
थेट बनावट एबी फॉर्म जोडला
मुंबईतील प्रभाग क्रमांक 173 मधील शिल्पा केळुसकर यांनी उमेदवारी न मिळाल्याने थेट बनावट एबी फॉर्म (कलर झेराॅक्स) निवडणूक आयोगाकडे उमेदवारी अर्ज सादर केला. इतकेच नव्हे तर हा अर्ज सुद्धा वैध ठरवण्यात आल्याने व्यवस्थेच्या चिंधड्या झाल्या आहेत. दुसरीकडे आता शिल्पा केळुसकर यांचा उमेदवारी अर्ज वैध झाल्याननंतर त्यांचे पती दत्ता केळुसकरहे नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.
भाजपने ठरवले आहे, मराठी महापौर होऊन द्यायचा नाही. त्यामुळे कृपाशंकर सिंह यांची नेमणूक करण्यात आली आहे. कृपाशंकर सिंह यांनी हे वक्तव्य अनावधनाने केलेले नाही, जाणीवपूर्वक केले आहे. -संजय राऊतhttps://t.co/UHQBpFVfcg#SanjayRaut #MarathiNews pic.twitter.com/tO9JYXmVpI
— ABP माझा (@abpmajhatv) January 1, 2026
प्रभाग क्रमांक 173 ची जागा शिंदेसेनेला
जागा वाटपामध्ये प्रभाग क्रमांक 173 ची जागा शिवसेना शिंदे गटाला गेली आहे. त्यामुळे या ठिकाणी माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. दुसरीकडे, बनावट फॉर्म दिल्याचे लक्षात येताच भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. दुसरीकडे, केळुसकरांचा उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी भाजपकडून पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आली.
भाजपने आधी एबी फॉर्म दिला होता
मुंबईतील भाजप अध्यक्ष अमीत साटम यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. महापालिकेच्या निवडणूक आयोगाला त्यांनी या संबंधी पक्ष लिहित शिल्पा केळुस्कर यांचा अर्ज रद्द करण्याची मागणी केली. शिल्पा केळुस्कर यांना भाजपने आधी एबी फॉर्म दिला होता. पण नंतर तो पक्षाने परत काढून घेतला. मग शिल्पा केळुस्कर यांनी डुप्लिकेट एबी फॉर्म तयार केला आणि तो अर्जासोबत जोडल्याचं समोर आलं.
इतर महत्वाच्या बातम्या





















