ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
Amit Thackeray on Devendra Fadnavis: अमित ठाकरे यांनी आपल्या व्हिडिओमधून शेतकरी आत्महत्या, महागाई, महिला सुरक्षा, प्रदूषण आणि राजकारणामध्ये झालेला विकृतपणा यावरून प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

Amit Thackeray on Devendra Fadnavis: महापालिका निवडणुकीसाठी प्रचार संपून उद्या मतदानासाठी अवघे काही तास बाकी असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती प्रहार केला आहे. फक्त फडणवीस यांच्यासाठीच व्हिडिओ म्हणत अमित ठाकरे यांनी या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे द्यावेच लागतील असं अमित ठाकरे यांनी आपल्या व्हिडिओमधून म्हटलं आहे. अमित ठाकरे यांनी आपल्या व्हिडिओमधून शेतकरी आत्महत्या, महागाई, महिला सुरक्षा, प्रदूषण आणि राजकारणामध्ये झालेला विकृतपणा यावरून प्रश्नांची सरबत्ती केली आहे. सोलापूरमध्ये झालेल्या खून प्रकरणांमध्ये त्या कुटुंबाला आपल्याला आधार द्यावासा का वाटलं नाही अशीही विचारणा अमित ठाकरे यांनी आपल्या व्हिडिओमधून केली आहे.
एका सामान्य नागरिकाचा मुख्यमंत्र्यांना सवाल
अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून थेट, जाहीर आणि अंगावर शहारा आणणारे प्रश्न उपस्थित केले आहेत. व्हिडिओ करताना अमित ठाकरे यांनी हा व्हिडिओ कोणत्याही प्रचारासाठी नसून एका सामान्य नागरिकाचा मुख्यमंत्र्यांना सवाल असल्याचे ते म्हणाले. मी राजसाहेबांचा मुलगा म्हणून नाही, कोणत्याही पक्षाचा नेता म्हणून नाही, तर एक सामान्य नागरिक म्हणून बोलतोय, मी तुमचा प्रचार बघतोय, मी तुमच्या मुलाखती बघतोय. पण मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला जे प्रश्न विचारले गेले पाहिजेत, दुर्दैवाने ते विचारले जात नाहीत. तेच मी आज विचारायला आलो असल्याचे ते म्हणाले.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक सामान्य नागरिक म्हणून माझे काही गंभीर प्रश्न… pic.twitter.com/8PIqIcmFJf
— Amit Thackeray (@amitrthackeray) January 14, 2026
गृहमंत्री म्हणून महिला सुरक्षित वाटतात का?
अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे की गेल्या सात महिन्यांमध्ये राज्यात 93 मुली गायब झाले असताना, बलात्कार केस वाढत असताना आपण आरोपीला तिकीट देता? या राज्यात आपण गृहमंत्री म्हणून महिला सुरक्षित वाटतात का? अशी विचारणा ठाकरे यांनी केली आहे. ते म्हणाले की 2014 पासून ते 2026 पर्यंत आपली सत्ता आहे. या कार्यकाळामध्ये आपण मुख्यमंत्री राहिला, उपमुख्यमंत्री राहिला, केंद्रामध्येही आपली सत्ता आहे, असं असूनही महागाई कमी का झाली नाही? अशी विचारणा त्यांनी केली आहे. प्रदूषणाचा प्रश्न उपस्थित करताना त्यांनी म्हटले की आपल्या शहरांचा AQI खराब होत आहे. त्यामुळे अस्थमा, कॅन्सर, हृदयविकारासारखे आजार वाढत आहेत, त्यामुळे स्वच्छ हवा का मिळली नाही? असा सवाल त्यांनी केला आहे. शाळा कॉलेज परिसरामध्ये ड्रग्ज विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. पुढील पिढी बर्बाद होत असताना ते तुम्हाला दिसत नाही का? अशीही विचारणा केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या




















