एक्स्प्लोर

Ajit Pawar: लाडकी बहीण योजनेचा प्रतिसाद पाहून विरोधक गडबडलेत; महायुतीचं रिपोर्ट कार्ड मांडत अजित पवारांचं टीकास्त्र

CM Ladki bahin Yojana: महायुती सरकारची संयुक्त पत्रकार परिषद, यावेळी महायुतीच्या घटकपक्षांचे नेते उपस्थित होते. अजित पवारांनी विरोधकांना फटकारले.

मुंबई: महायुती सरकारच्या योजना जनतेमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रतिसाद पाहून विरोधक घाबरले आहेत, असं म्हणणार नाही, पण विरोधक योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून गडबडले आहेत, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. गेल्या दोन वर्षांमध्ये महायुती सरकारने जनतेच्या आयुष्यात बदल घडवून आणला आहे. महिला, उद्योग, रोजगार अशा विविध क्षेत्रात सरकारने अविरत मेहनत घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ते बुधवारी महायुती सरकारच्या (Mahayuti) संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी महायुती सरकारचे गेल्या दोन वर्षातील कामगिरीचे रिपोर्ट कार्ड सादर करण्यात आले.

या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडताना विरोधकांना टोले लगावले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतंर्गत पाच महिन्यांत महिलांना पैसे देण्यात आले आहेत. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. लाडक्या बहि‍णींच्या आयुष्यातील सकारात्मक बदल विरोधकांच्या पचनी पडत नाही. मी जबाबदारीने सांगतो की, लाडकी बहीण योजनेसाठी आधी 10 हजार कोटी नंतर 35 हजार कोटींची तरतूद केली आहे. ही योजना तात्पुरती नाही. हे पैसे तुमचा अधिकार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या पैशात वाढ करण्याचं सुतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्याबद्दल आम्ही विचार करत आहोत, असे अजित पवार यांनी सांगितले.  

विरोधक फेक नरेटिव्ह सेट करु पाहत आहेत: अजित पवार

राज्यातील विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. आता काही लोक फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवातीला भाजप आणि शिवसेनेचं सरकार स्थापन झालं.त्यानंतर वर्षभराने आम्ही सरकारमध्ये सामील झालो. दीड वर्षे आम्ही सगळे काम करत आहोत. त्याचा लेखाजोखा आम्ही रिपोर्ट कार्डमधून मांडत आहोत. 

निवडणुकीपूर्वीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बरेच निर्णय होतात. त्याचे काही कारण देता येत नाही. सरकार राहिलेले सर्व निर्णय या काळात वेगाने घेते. पण आम्ही सर्व योजना विचारपूर्वक सुरु केल्या आहेत. अर्थसंकल्पात योजनांची घोषणा केल्यानंतर विरोधकांनी त्याची टिंगलटवाळी केली. आमची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली. आम्ही या माध्यमातून गरीब महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. यावरुन विरोधक सुरुवातीला पैसे येणार नाहीत, असा प्रचार करत होते. नंतर म्हणाले आलेले पैसे काढून घ्या, अन्यथा सरकार परत काढू घेईल. विरोधकांना आरोप-प्रत्यारोपाचा अधिकार आहे. पण हे करताना विरोधकांनी थोडफार तारतम्य बाळगलं पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले. 

आणखी वाचा

स्थगिती सरकार गेल्यावर गती आणि प्रगतीचे सरकार राज्याने पाहिले: फडणवीस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
New Justice Statue : भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान
भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान
Solaur vidhansabha : शरद पवारांच्या तुतारीने बदलंलं गणित, मोहिते पाटलांची साथ ठरणार 'उत्तम'; माळशिरसमधून आमदार कोण?
शरद पवारांच्या तुतारीने बदलंलं गणित, मोहिते पाटलांची साथ ठरणार 'उत्तम'; माळशिरसमधून आमदार कोण?
नागपुरात श्याम मानव यांच्या सभेपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांचा गोंधळ; बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
नागपुरात श्याम मानव यांच्या सभेपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांचा गोंधळ; बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : न्यायदेवतेवरच्या डोळ्यांवरची पट्टी हटवली, हातात तलवारीऐवजी संविधानZero Hour : अमित शाहांचं ते वक्तव्य आवाहन की दबावतंत्र? शाहांना नेमकं काय सुचवायचंय?ABP Majha Headlines : 8 PM : 16 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सHiraman Khoskar : निर्मला गावितांना उमेदवारी द्यायचीय म्हणून माझ्यावर क्रॉस व्होटिंगचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
New Justice Statue : भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान
भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान
Solaur vidhansabha : शरद पवारांच्या तुतारीने बदलंलं गणित, मोहिते पाटलांची साथ ठरणार 'उत्तम'; माळशिरसमधून आमदार कोण?
शरद पवारांच्या तुतारीने बदलंलं गणित, मोहिते पाटलांची साथ ठरणार 'उत्तम'; माळशिरसमधून आमदार कोण?
नागपुरात श्याम मानव यांच्या सभेपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांचा गोंधळ; बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
नागपुरात श्याम मानव यांच्या सभेपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांचा गोंधळ; बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
आमदार सतिश चव्हाणांचे पत्र अत्यंत गंभीर; पक्षाकडून कारवाई होणार; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
आमदार सतिश चव्हाणांचे पत्र अत्यंत गंभीर; पक्षाकडून कारवाई होणार; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
मुंबईकरांनो 2 दिवस पाणी जपून वापरा; वैतरणा जलवाहिनीत बिघाड, पाणीपुरवठा कपात
मुंबईकरांनो 2 दिवस पाणी जपून वापरा; वैतरणा जलवाहिनीत बिघाड, पाणीपुरवठा कपात
Sharad Pawar NCP : इस्लामपुरात शरद पवारांच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता सभेत तुफान पाऊस; भर पावसात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
इस्लामपुरात शरद पवारांच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता सभेत तुफान पाऊस; भर पावसात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
Maharashtra Vidhan Sabha Election : महायुतीच्या जागावाटपावर भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक; फडणवीस, बावनकुळे दिल्लीत पोहोचले
महायुतीच्या जागावाटपावर भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक; उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे दिल्लीत पोहोचले
Embed widget