एक्स्प्लोर

महायुतीचं रिपोर्ट कार्ड सादर, विरोधकांनी आमची टिंगल टवाळी केली, अजित पवारांचा हल्ला

महायुतीच्या रिपोर्ट कार्डचे उद्घाटन आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्‍यांच्या उपस्थित झालं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) जाहीर झाल्यानंतर महायुतीने प्रचाराला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महायुतीच्या रिपोर्ट कार्डचे  (Maha Yuti Report card Maharashtra ) उद्घाटन आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्‍यांच्या उपस्थित झालं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, माजी विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर उपस्थित होते. 

तीन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने महायुतीच्या भ्रष्टाचाराचा पंचनामा करणारा रिपोर्ट प्रसिद्ध केला होता, त्याला महायुतीकडून उत्तर देण्यात आल्याचं पाहायला मिळालं. 

दरम्यान, विरोधकांनी आमची टिंगलटवाळी केली, विरोधक गडबडलेले आहेत, ते घाबरलेत असं म्हणणार नाही पण गडबडले आहेत, असं अजित पवार म्हणाले. तर ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला त्यांनी आम्हाला कायदा शिकवू नये, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांनी केला. 

महायुतीची पत्रकार परिषद, अजित पवार काय म्हणाले? 

आमच्या समोरच्या लोकांनी फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला. आमचे महायुतीचे 2022 ते 2024 चे रिपोर्ट कार्ड देत आहोत. यांनी तिजोरी मोकळी केली असे काहींनी आरोप केले. शेवटच्या अर्थसंकल्पमध्ये काही तरतुदी केल्यात त्यावर टिंगल टवाळी केली.  लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली. 

काही तरी बोलायचं आणि जनतेमध्ये संभ्रम पसरवायचं. सुटसुटीत दोन पानांचं हे रिपोर्ट काढले आहे. हा बदलाचा अहवाल आहे. आमच्या मेहनतीचा हा लेखाजोखा आहे. 

आमचे विरोधक थोडे गडबडले आहेत. घाबरलेत असं म्हणणार नाही, पण गडबडले आहेत. 

देवेंद्र फडणवीस  काय म्हणाले? 

- निवडणुकीचा शंखनाद झालाय
- आमच्यासाठी शंखानाद तर इतरांसाठी ऐलान झालंय
- आम्ही संक्षिप्त रिपोर्ट कार्ड आज मांडत आहोत
- स्थगिती सरकार गेल्यावर गती आणि प्रगतीचे सरकार राज्याने पाहिले
- मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात परिवर्तनशील योजना महाराष्ट्रात आणल्या गेल्या
- शेतकऱ्यांना वीज देण्यासाठी स्वतंत्र कंपनी तयार करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 365 दिवस वीज मिळणार आहे याचं काम सुरू आहे
- साडेआठ रुपये दराने मिळणारी वीज तीन रुपये दराने मिळणार आहे
- वीजबिल माफीचा निर्णय विचार करूनच घेण्यात आला आहे 

- मविआ काळात एकाही प्रकल्पाला सुधारित मान्यता मिळाली नव्हती
- आम्ही 145 प्रकल्पांना सुधारित मान्यता दिल्याने 22 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे
- वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प मंजूर करून 55 टीएमसी पाण्याचा प्रश्न निकाली काढून मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे
- सिंचन क्षेत्रात भरपूर काम केलंय
- होमगार्डच्या वेतनात भरघोस वाढ करून दिली
- वेगवेगळ्या समाजासाठी महामंडळे तयार करून न्याय देण्याचा प्रयत्न
- अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख तरुणांना उद्योजक बनविले
- पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीही महामंडळ करून आम्ही विचार केला

- विरोधी पक्ष पूर्णतः कन्फ्युज आहे
- नव्या योजना आणू म्हणणाऱ्या विरोधकांचा पर्दाफाश झाला आहे
- लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेस नेते कोर्टात गेले पण तसं झालं नाही
- उद्धव ठाकरेंनी म्हटलंय की आम्ही महायुतीच्या सगळ्या योजना बंद करू, स्थगिती सरकार आणून महाराष्ट्राला कुलूपबंद करण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही
 - उद्योगपतींच्या घराबाहेर बॉम्ब ठेवणारे आम्हाला कायदा सुव्यवस्थेबाबत सांगत आहेत
- आरोपींना कोरोना काळात गाड्या उपलब्ध करुन देणारे आज कायद्यावर बोलत आहेत
- निर्भया पथकाच्या गाड्या नेत्यांच्या ताफ्यात होत्या
- केवळ नरेटिव्ह तयार करणे विरोधकांचा प्रयत्न
- विरोधक हेच गुजरातचे Brand Ambassador 
- महाराष्ट्र पुढे आहे आणि पुढेही महाराष्ट्रच पुढे राहील
- जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळेल
- उर्वरीत कामे आम्ही पुढील पाच वर्षात पूर्ण करू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

- रिपोर्टकार्ड सादर करायला हिंमत लागते
- विरोधकांनी आमच्या विरोधात एक व्हिडिओ बनविला
- बनविणारा शुद्धीत होता का ?
- भाषणात राजभाषेवर बोलताना गाईवर बोलले
- कॉमन मॅन सुपरमॅन झाला पाहिजे
- सुनील केदारचा माणूस योजनाच्या विरोधात कोर्टात जातो
- 2 कोटी 30 लाख महिलांच्या खात्यावर पैसे टाकले

 - लाडकी बहीण योजनेला कुणी टच करायला गेला तर त्याचा करेक्ट कार्यक्रम होणार
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा

पायाभूत सुविधांमध्ये राज्य देशात एक नंबरवर आहे
कोस्टल, अटल सेतू, मेट्रो, समृद्धीने तुम्ही प्रवास करतात
मुंबई पुणे मिसिंग लिंक काम करत आहोत
पायाभूत प्रकल्प हे राज्याच्या विकासाला गती देणारे असतात
त्या राज्याची प्रगती वेगवान होते
कनेक्टिव्हिटी महत्त्वाची असते
दोन वर्षांत सर्व काही केले हे म्हणणार नाही
पण मविआ व महायुती यांच्या कामाची तुलना केली 
तर त्यांनी अटल सेतू, मेट्रो कारशेड अशी कामे बंदर केली
स्पीड ब्रेकर टाकले
आम्ही आलो नसतो तर काम सुरु झाले नसते
मला सांगितले होते कामाला स्थगिती द्या व चौकशी लावा
त्यांच्या बालहट्ट व अहंकारामुळे १७ हजार कोटी रुपये वाढले
हे दुर्दैव आहे
विकास विरोधी काम दृष्टीकोन ठेवणे
गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात  आता उद्योग पोहोचले आहेत
इतकं सुरक्षित वातावरण तयार झालं आहे
उद्योग स्नेही राज्य म्हणून महाराष्ट्र तयार झाले आहे
लाखो कोटी रुपयांचे प्रकल्प राज्यात होत आहेत
उद्योग पळाले बोलतात, ते कुठे सुरु झाले हे तरी सांगा
खोटं बोलायचे पण रेटून बोलायचे
घरातील प्रत्येक माणूस योजनेत घेतला आहे

जन्माला आलेली मुलगी, शिक्षण, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगारांना लाभ दिला

 आम्हाला कॉमनमॅनला ताकद द्यायची आहे
त्याची टिंगल करत आहेत
सुनील केदारचा माणूस
मुंबईतून कोर्टाने हाकलले तर नागपूर कोर्टात गेले
२ कोटी ३० लाख महिलांना खात्यात पैसे गेले
देण्याची आमची नीती आहे
लाडकी बहिण, लखपती लेक, मोफत शिक्षण देत आहोत
तीर्थ दर्शन योजनेच्या गाड्या जाऊ लागल्या
बळीराजा वीजबिल माफ योजना
तिजोरीवर पहिला अधिकार शेतकरी व बळीराजाचा आहे
त्याग करा अशी कुठेही चर्चा झाली नाही... टेबल बातमी आहे

Mahayuti PC LIVE : महायुतीची पत्रकार परिषद

संबंधित बातम्या 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
Kurla Bus Accident: अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे बसमधून कसा बाहेर पडला? 'तो' व्हिडीओ व्हायरल
अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे 'त्या' दोन बॅग घेऊनच आरामात बाहेर पडला, VIDEO व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Cabinet Expansion :मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचाच वरचष्मा,14 तारखेला मंत्रिमंडळ मिळणार?Kurla Special Report  : कुर्ला अपघातात मृत महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या लंपास Video ViralKalyan Durgadi Malanggad Special Report : आनंद दिघे धर्मवीर कसे झाले?काय आहे मलंगगड दुर्गाडीची मोहीमParbhani : आंदोलक बेलगाम, निष्पापांची होरपळ; व्यावसायिकांचं हजारोंचं नुकसान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
Kurla Bus Accident: अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे बसमधून कसा बाहेर पडला? 'तो' व्हिडीओ व्हायरल
अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे 'त्या' दोन बॅग घेऊनच आरामात बाहेर पडला, VIDEO व्हायरल
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
Embed widget