एक्स्प्लोर

राज्यातील शाळा सुरू झालेल्या ठिकाणचा अहवाल शिक्षण विभागाकडून जाहीर, वाचा.. कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक उपस्थिती

राज्यातील शाळा सुरू झालेल्या ठिकाणचा अहवाल शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. राज्यात आतापर्यत 8 वी ते 12 वी वर्गाच्या 17 हजार 701 शाळा सुरू तर 14.27 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती.

मुंबई : आतापर्यत इयत्ता 8 ते 12 वी शाळा सुरू केल्यानंतर प्राप्त माहितीचा अहवाल शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आला. यामध्ये 18 ऑगस्ट या एका दिवशी माहिती गोळा करून हा अहवाल तयार केलेला आहे. यामध्ये इयत्ता 8 वी ते 12 वी वर्गात शिकणारे या दिवशी राज्यातील 15,12,404 विद्यार्थी शाळेत उपस्थित राहिले आहेत. तर राज्यभरात इयत्ता आठवी ते बारावी वर्गाच्या आतापर्यत 17,701 शाळा सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

ज्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, त्यात इयत्ता 8 वी ते 12 वी वर्गाचे एकूण विद्यार्थी 1,03,07,457 संख्या आहे. त्यातील फक्त 14.67 टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित दर्शवली आहे. तर एकूण शाळेच्या संख्या लक्षात घेता 38.18 टक्के शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक शाळा अमरावती विभागात 2,282 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, त्यात यवतमाळ जिल्ह्यात 779 शाळा सुरू झाल्या आहेत. तर शाळेत उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ही लातूर विभागाची सर्वाधिक असून या विभागात 56.58 विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. यामध्ये काही जिल्ह्यांची माहिती शिक्षण विभागाला आणखी प्राप्त होणे बाकी आहे.

17 ऑगस्टपासून राज्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र, कोविड टास्क फोर्सच्या सूचनेनंतर हा निर्णय शिक्षण विभागाला मागे घ्यावा लागला. त्यामुळे 15 जुलैपासून ज्या कोरोना मुक्त जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्याठिकाणची सद्यस्थिती आणि आकडेवारी दर्शविणारा हा अहवाल आहे. अजूनही अनेक विद्यार्थी शाळा सुरू झालेल्या असताना सुद्धा शाळेत येत नसल्याचं या आकडेवारीवरून दिसत आहे. तर अनेक गावांमध्ये शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढताना दिसत असल्याचं या आकडेवारीतून समोर येत आहे. हा अहवाल आणि आकडेवारी शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकार विचार करेल तेव्हा महत्त्वाचा ठरणार आहे. जेणेकरून शाळा सुरू करण्याबाबतची पुढील दिशा राज्य सरकारला ठरवता येईल.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Harshada Deshmukh On Election : मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
Maharashtra HSC Exam : राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार
राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार
Students Fees Waiver: दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना सरकारचा मोठा दिलासा! दहावी- बारावी परीक्षार्थींचे शुल्क पूर्णतः माफ; 305 तालुक्यातील विद्यर्थ्यांना मिळणार लाभ
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना सरकारचा मोठा दिलासा! दहावी- बारावी परीक्षार्थींचे शुल्क पूर्णतः माफ; 305 तालुक्यातील विद्यर्थ्यांना मिळणार लाभ
MPSC Student Protest: पदभरती कधी करणार? MPSC विद्यार्थ्यांकडून राज्यातील अनेक मंत्री अन् अधिकाऱ्यांना फोनचा तगादा; मेलबॉक्सही फुल, नेमकं प्रकरण काय?
पदभरती कधी करणार? MPSC विद्यार्थ्यांकडून राज्यातील अनेक मंत्री अन् अधिकाऱ्यांना फोनचा तगादा; मेलबॉक्सही फुल, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praful Patel NCP : 'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरे कर्जतच्या डोंगरात, स्थानिकांशी संवाद; साय डोंगरातील वृक्षतोड जवळून पाहिली, जाहीर सभेतून एल्गार
Raj Thackeray Karjat: राज ठाकरे कर्जतच्या डोंगरात, स्थानिकांशी संवाद; साय डोंगरातील वृक्षतोड जवळून पाहिली, जाहीर सभेतून एल्गार
Pune MLC Election : 6770 मतांचा फरक; विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी, पुणे शिक्षक निवडणुकीत यश मिळाल्यानंतर कौस्तुभ गावडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6770 मतांचा फरक; विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी, पुणे शिक्षक निवडणुकीत यश मिळाल्यानंतर कौस्तुभ गावडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिक्षक, पदवीधरमध्ये सत्ताधारी काँग्रेसला कर्नाटकात एकही जागा नाही, दारुण पराभव; बिहारमध्येही मोठा उलटफेर
शिक्षक, पदवीधरमध्ये सत्ताधारी काँग्रेसला कर्नाटकात एकही जागा नाही, दारुण पराभव; बिहारमध्येही मोठा उलटफेर
वीजेचा धक्का लागून शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू; नातेवाईकांसह शिवसेना कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी
वीजेचा धक्का लागून शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू; नातेवाईकांसह शिवसेना कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Nitesh Karale Nagpur MLC Election Result 2026: मतदानापूर्वी पक्षातून हाकललं, कराळे मास्तरांना नागपूर पदवीधर निवडणुकीत 24 हजार मतं पडली, आता शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया
मतदानापूर्वी पक्षातून हाकललं, कराळे मास्तरांना नागपूर पदवीधर निवडणुकीत 24 हजार मतं पडली, आता शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया
Gokul Election: महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
Embed widget