Contractor Money Pending | सरकारी काम पण किती महिने थांब? ठेकेदारांना पैसे कुणी अडवले? Special Report
Contractor Money Pending | सरकारी काम पण किती महिने थांब? ठेकेदारांना पैसे कुणी अडवले? Special Report
सरकारी काम आणि सहा महिने थांब, असं आपल्याकडं नेहमीच म्हटलं जातं. सध्या सरकारी कामं करणाऱ्या कंत्राटदारांना याचा चांगलाच अनुभव येतोय. केवळ सहा महिनेच नाही, तर वर्षभरापासून राज्यातल्या कंत्राटदारांचे कोट्यवधी रुपये सरकारकडं रखडलेत. सरकारकडून केवळ आश्वासनं मिळत असून प्रत्यक्षात मात्र पैसे मिळत नसल्यामुळं आता कंत्राटदारांच्या संघटना आक्रमक होऊ लागल्यात. येत्या ९ मार्चला कंत्राटदारांनी मुंबईत एकवटण्याचा निर्धार केलाय. पाहूया, याबाबतचा एक खास रिपोर्ट.
ही व्यथा आहे महाराष्ट्रातील सरकारी कामं करणाऱ्या कंत्राटदारांची.
निविदा निघाल्या, कंत्राटदार नेमले, कामंही झाली…
पण या कामाचे पैसे काही कंत्रादरांना मिळाले नाहीत.
गेल्या वर्षभरापासून राज्यभरातील कंत्राटदारांचे तब्बल ७७ हजार कोटी रुपये सरकारकडं थकलेत.
आणि याचा पाठपुरावा करून करून आता कंत्राटदारही थकलेत.
त्यामुळेच कंत्राटदार संघटनांनी येत्या ९ मार्चला मुंबईत एकत्र येण्याचा निर्धार केलाय.
All Shows


































