एक्स्प्लोर

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवलेंचं नाव निश्चित? फडणवीसांच्या बंगल्यावरील बैठकीत ऐनवेळी दोन नवीन नावं समोर

Rajya Sabha Election 2026: फडणवीसांच्या बंगल्यावरील बैठकीची इनसाईड स्टोरी, भाजपचे राज्यसभेचे 4 उमेदवार ठरले, विनोद तावडेंचं नाव जवळपास निश्चित, पण ऐनवेळी दोन वेगळीच नाव पुढे आली

Rajya Sabha Election 2026: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी येत्या 16 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे सहा दिवस शिल्लक राहिल्यामुळे भाजपकडून (BJP) त्यांच्या कोट्यातली 4 जागांवरील उमेदवारांची नावे ठरवण्यासाठी चर्चा सुरु होती. यासंदर्भात मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह 12 प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. (Maharashtra Politics)

कालपासून भाजप रामदास आठवले आणि विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवणार अशी जोरदार चर्चा होती. तर विजया रहाटकर यांचे नावही राज्यसभेसाठी जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र, वर्षा बंगल्यावर कालच्या बैठकीत ऐनवेळी दोन आणखी नावे राज्यसभा उमेदवारीसाठी समोर आली आहे. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि भागवतराव कराड यांचा समावेश आहे. यापैकी रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांचे नाव निश्चित आहे. मात्र, उर्वरित तीन जागांवर विनोद तावडे, विजया रहाटकर, रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार, हे आता पहावे लागेल. राज्यसभा उमेदवारांची अंतिम निवड करण्यासाठी रविंद्र चव्हाण आता दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेणार असल्याचे समजते. त्यामुळे पुढील एक-दोन दिवसांमध्ये  भाजपच्या राज्यसभा उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

MVA Rajyasbha Candiate: मविआचा राज्यसभेचा उमेदवार  कोण?

महाविकास आघाडीच्या आमदारांची आज विधानभवनात बैठक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते. ठाकरेंच्या सेनेकडून आदित्य ठाकरे हे राज्यसभेची एक जागा शिवसेनेला मिळावी म्हणून आग्रही आहेत. मात्र, मविआकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवार हे सध्या रुग्णालयात आहेत. त्यामुळे ते राज्यसभा निवडणूक लढणार की नाही, हे अद्याप निश्चित नाही. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे आज त्यांच्याशी चर्चा करतील. त्यासाठी शरद पवार गटाने काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून वेळ मागून घेतला आहे. विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार महाराष्ट्रातील 7 जागांपैकी सहा जागांवर महायुती आणि एका जागेवर महाविकास आघाडीचा खासदार निवडून जाऊ शकतो. 

Rajyasabha Election 2026: कसं असणार राज्यसभेतल्या जागांसाठीचं गणित?

राज्यसभेच्या एकूण जागा : 7
विद्यमान विधानसभा सदस्य : 286
(अजित पवार आणि शिवाजी कर्डिले या दोन जागा रिक्त)
कोटा : 3576 (म्हणजे 3600 मते) ( येथे एका आमदाराचे मत म्हणजे 100, म्हणून 36 आमदार हा कोटा)
(फॉर्म्युला : 286 गुणिला 100/भागिला 7 जागा+1/अधिक+1)
(अर्थात एकूण झालेल्या मतदानावरुन कोटा निश्चित होतो)

भाजपा : 136 (कर्डिले 1 वगळता)
तीन जागांसाठी लागणार : 108
भाजपाकडे अतिरिक्त मते : 28

शिवसेना : 56
एक जागेसाठी लागणार : 36
अतिरिक्त मते : 20

राष्ट्रवादी : 40 (अजित पवार वगळता)
एक जागेसाठी लागणार : 36
अतिरिक्त मते : 4
.....
महायुती : 52 अतिरिक्त मते
सहाव्या जागेची 36 मते वजा केली तरी 16 मते अतिरिक्त
म्हणजे सातवा उमेदवार निवडून आणायचा असेल तर 20 मते अतिरिक्त आणावी लागतील.
.....
उबाठा : 20
एका जागेसाठी अतिरिक्त लागतील : 16

शरद पवार : 10
एका जागेसाठी अतिरिक्त लागतील : 26

काँग्रेस : 16
एका जागेसाठी अतिरिक्त मते लागतील : 20
(त्यामुळे महाविकास आघाडीचा एक उमेदवार जिंकायचा असेल तर दोन शक्यता: तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन एक उमेदवार देणे, किंवा काँग्रेस आणि उबाठा हे दोनच पक्ष एकत्र आले तरी 36 असे काठावरचे बहुमत त्यांना लाभते)

आणखी वाचा

राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त 6 दिवस उरले, शरद पवार रुग्णालयात, राष्ट्रवादीने मविआकडे वेळ मागितला, नक्की काय घडलं?

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
DCM Sunetra Pawar: अजित पवारांच्या पावलावर पाऊल; सुनेत्रा पवारांचा बारामतीत 'जनता दरबार'; लाडक्या बहिणींसह, वकिल, नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण, नागरिकांची गर्दी
अजित पवारांच्या पावलावर पाऊल; सुनेत्रा पवारांचा बारामतीत 'जनता दरबार'; लाडक्या बहिणींसह, वकिल, नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण, नागरिकांची गर्दी
Anil Parab: मुख्यमंत्र्यांनी स्टे दिला, महापौर बाईंनी भरतीवरील स्टे काढला; देवेंद्र फडणवीसांपेक्षा रितू तावडे मोठ्या झाल्यात का?, अनिल परब नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांनी स्टे दिला, महापौर बाईंनी भरतीवरील स्टे काढला; देवेंद्र फडणवीसांपेक्षा रितू तावडे मोठ्या झाल्यात का?, अनिल परब नेमकं काय म्हणाले?
Buldhana Crime : सलग तीन वर्ष अवैधरित्या उत्खनन, महसूल विभागाकडून 30 कोटींचा दंड; भाजप आमदाराच्या आक्रमक पावित्र्यानंतर पुण्याच्या नामांकित कंपनीवर गुन्हा दाखल
बुलढाण्यात सलग तीन वर्ष अवैधरित्या उत्खनन, महसूल विभागाकडून 30 कोटींचा दंड; भाजप आमदाराच्या आक्रमक पावित्र्यानंतर पुण्याच्या कंपनीवर गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
नाम नरेंदर, काम सरेंडर, नरेंदर गायब, सिलेंडर गायब, देशातील गॅस संकटावरून लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी दोन्ही सभागृहात नोटीस
नाम नरेंदर, काम सरेंडर, नरेंदर गायब, सिलेंडर गायब, देशातील गॅस संकटावरून लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी दोन्ही सभागृहात नोटीस
Share Market Crash : शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स पाच दिवसात 4350 अंकांनी कोसळला,गुंतवणूकदारांना मोठा धक्का, तब्बल 20 लाख कोटी बुडाले
अमेरिका- इराण युद्ध, तेलाच्या वाढलेल्या दरानं शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 5 दिवसात 20 लाख कोटी बुडाले
Multibagger Stock: 11 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 5 वर्षात 1200 रुपयांवर, एक लाखांचे बनले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल  
11 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 5 वर्षात 1200 रुपयांवर, एक लाखांचे बनले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल  
Period Leave : ... तर महिलांना कुणी नोकरी देणार नाही; पीरियड लीव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
... तर महिलांना कुणी नोकरी देणार नाही; पीरियड लीव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
US inquiry into India: पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरु! आता अमेरिकेनं भारताची थेट चौकशी लावली; रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरु! आता अमेरिकेनं भारताची थेट चौकशी लावली; रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
India on US bombing of Iranian school: अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
Embed widget