11th Online Admission Timetable : अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे विशेष फेरीसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर; वाचा सविस्तर माहिती
11th Online Admission Timetable : 11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2022-23 या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
11th Online Admission Timetable : शिक्षण संचालनालय (माध्यमिक आणि उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत 11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2022-23 या प्रवेश प्रक्रियेचे विशेष फेरीसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असणार आहे. या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया 25 ऑगस्टपासून सुरु झाली होती. ही प्रवेश प्रक्रिया 29 ऑगस्टपर्यंत असणार आहे.
या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांनी 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान अर्जाचा भाग 1 आणि भाग 2 भरून विद्यालयाच्या पसंती क्रमांक विशेष फेरीसाठी द्यायचे आहेत. यामध्ये भाग 1 पूर्ण करूनच भाग 2 ची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ही मुदत 29 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे.
31 ऑगस्टपर्यंत डेटा प्रोसेसिंग प्रक्रिया :
29 ऑगस्ट रोजी पसंतीच्या महाविद्यालयाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 30 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत डेटा प्रोसेसिंगची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
1 सप्टेंबरला संकेतस्थळावर यादी पाहता येईल :
1 सप्टेंबर सकाळी 10 वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी विद्यालय निवड यादी संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल.
2. विद्यार्थी लॉग इन मध्ये त्याला प्रवेशासाठी मिळालेले राज्य उच्च माध्यमिक विद्यालय दाखविले जाईल.
3. संबंधित विद्यालयास प्रवेशासाठी मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी कॉलेज लॉग इन मध्ये दाखविले जाईल.
4. फेरीचे कट ऑफ पोर्टलवर दाखवली जाईल.
1 ते 6 सप्टेंबर दरम्यान विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे
ज्या विद्यार्थ्यांना विशेष फेरीमध्ये कॉलेज प्राप्त होतील त्या विद्यार्थ्यांनी 01 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर दरम्यान कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. तसेच मिळालेले विद्यालय नको असल्यास प्रवेश रद्द देखील या दरम्यान करू शकाता. विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करणे आवश्यक आहे.
दिनांक 6 सप्टेंबरला रात्री 8 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती पोर्टलवर ऑनलाईन नोंदविणेसाठी उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी वेळ देण्यात आली आहे. तर, 7 सप्टेंबर रोजी रिक्त जागांचा तपशील जाहीर केला जाईल.
महत्वाच्या बातम्या :
- JEE Advanced 2022 Exam: JEE Advanced परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' तारखेला जारी होणार, जाणून घ्या
- UGC ने जाहीर केली 21 बनावट विद्यापीठांची यादी, 'या' विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ नका, UGC चे आवाहन
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI