एक्स्प्लोर

NEET 2020 : आज नीट परीक्षा, विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 'ही' काळजी घ्यावी!

लॉकडाऊनमुळं लांबलेली नीट 2020 ची परीक्षा आज रविवारी पार पडत आहे. कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने शिक्षण विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे.

पुणे: लॉकडाऊनमुळं लांबलेली नीट 2020 ची परीक्षा आज रविवारी पार पडत आहे. कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने शिक्षण विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. दुपारी 2 ते 5 दरम्यान ही परीक्षा होईल. यासाठी विद्यार्थ्यांना दुपारी 11 ते 1:30 दरम्यान प्रवेश दिला जाईल. पुणे शहर आणि जिल्ह्यात 46 केंद्रावर ही परीक्षा पार पडेल. प्रत्येकवर्षी ही परीक्षा मे महिन्यात पार पडते. पण लॉकडाऊनमुळं यंदा ही परीक्षा पुढं ढकलण्यात आली. त्यामुळे नीटची परीक्षा नेमकी घेतली जाणार का? घेतली जाणार असेलच तर ती कधी घेतली जाणार? असे प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केले जात होते. याची उत्तरं अधांतरीच होती. त्यामुळे विध्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली होती. यावरून अनेकदा राजकारण ही रंगलं, शेवटी न्यायालयाने परीक्षा घेण्यावर शिक्कामोर्तब केला. त्यानंतर विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि विध्यार्थी अभ्यासाला लागले. बघता-बघता आता परीक्षा तोंडावर आली. पण आता विद्यार्थ्यांना चिंता सतावत आहे ती त्यांना परीक्षा केंद्रावर कोरोनाची लागण तर होणार नाही ना? त्यामुळेच परीक्षा केंद्रावर त्यांना नेमक्या कोणत्या सुविधा उपलब्ध असतील आणि विद्यार्थ्यांनी सोबत काय न्यायला हवं. याबाबत डीपर संस्थेने विद्यार्थ्यांना आवाहन केलेलं आहे. विद्यार्थ्यांनी न विसरता सोबत न्यायच्या वस्तू

1. अॅडमिट कार्ड 2. एक पासपोर्ट साईज फोटो 3. फोटो ID, शक्यतो आधार कार्ड 4. पाणी बाटली पारदर्शी 5. सॅनिटायझर बॉटल 50 ml

सेंटरवर हे मिळेल

1. तीन लेअर मास्क 2. 1 Gloves 3. 1 पेन

(या वस्तू मिळत असल्या तरीही वरील बाबी स्वतः ही बाळगाव्यात.)

कोविडविषयी सर्व सूचना नीट पाळा

एका वर्गात केवळ 12 विद्यार्थी बसविण्याची तयारी सुरू असल्याने काही प्रमाणावर सेंटर वाढविले जातील.

NTA ने विद्यार्थ्यांना एसएमएस आणि ई-मेल पाठवलेले आहेतच. कदाचित काहींना एसएमएस किंवा ईमेल मिळणार नाही. त्यावर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळी खबरदारी म्हणून केंद्रावर जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आपले सेंटर NTA च्या वेबसाईटवर तपासून घ्यावे.

वेळेचे नियोजन

दुपारी 2 ते 5 पेपर आहे. 1:30 वाजता शेवटची हॉल एन्ट्री आहे. सकाळी 11 पासून केंद्रावर तपासणी आणि Sanitize केले जाईल.

ड्रेस कोड असा ठेवला तर उत्तम

लांब बाह्यांचा शर्ट नको. मोठ्या बटन्स नकोत. जोडे घालून जाऊ नये. चप्पल वापरावी.

परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने वरील उपाययोजना केलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनी देखील वरील खबरदारी घ्यायला हवी. त्याबरोबरच केंद्रावर येताना आणि घरी जाताना देखील आपण कोरोना बाधितांच्या संपर्कात येणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव याचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव याचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना

व्हिडीओ

Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव याचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव याचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
Embed widget