एक्स्प्लोर

SSC Results 2020 | मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री म्हणतात, 'नापासांनो खचू नका, जिद्दीने यश खेचून आणा'

Maharashtra SSC Results 2020 : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा (Maharashtra SSC Results 2020 Declared) निकाल जाहीर झाला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्य़ांचं राज्यातील नेत्यांनी अभिनंदन केलं आहे तसंच त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

Maharashtra SSC Results 2020 : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा (Maharashtra SSC Results 2020 Declared) निकाल जाहीर झाला आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 17 लाख विद्यार्थ्यांची उत्सुकता संपली आहे.  राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. मागच्या 15 वर्षांतला हा सर्वाधिक निकाल असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या निकालात तब्बल 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. 242 पैकी 100 टक्के गुण मिळवणारे 151 विद्यार्थी फक्त लातूर विभागातले आहेत. दहावीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील नेतेमंडळींनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षणाने आपण समाजाचा, देशाचा विकास घडवू शकतो- मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा देताना म्हटलं आहे की, दहावीची परीक्षा शिक्षणाच्या वाटचालीतील एक टप्पा आहे, दहावीच्या परीक्षेत आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करता. अशा यशाचा आनंद हा निश्चितच मोठा असतो. त्यामुळे या प्रयत्नांसाठी आणि यशासाठी तुमचे आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच भावी वाटचालीसाठीही शुभेच्छा! निकाल काहीही असेल तो आनंदाने स्वीकारा. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांनी आणखी प्रयत्न करावेत.यश तुमचेच असेल, गरज असेल ती फक्त आणखी जोमाने प्रयत्न करण्याची. शिक्षणाने आपण समाजाचा, देशाचा विकास घडवू शकतो, त्यासाठी कटिबद्ध राहु या. सर्वांना शुभेच्छा!  यशाचे अनेक टप्पे तुम्ही पार करा- शरद पवार राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणतात की, विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीची दिशा ठरवणारा दहावी परीक्षेचा महत्त्वाचा टप्पा पार करणाऱ्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. आपल्या सर्वांची शैक्षणिक कारकीर्द अशीच बहरत राहो, आयुष्यात यशाचे अनेक टप्पे तुम्ही पार करत राहो या शुभेच्छा. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निराश न होता, यशस्वी होण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावेत, पालकांनीही निराश न होता मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. दहावी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. करिअरची दिशा ठरवून त्यादृष्टीने पाऊल टाकण्याची ही पहिली संधी असते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुढील वर्गात प्रवेश घेताना आवडीची शाखा निवडावी. पालकांनीही मुलांचा कल ओळखून त्यांच्यावर सक्ती न करता त्यांना आवडीचा अभ्यासक्रम निवडण्यासाठी प्रोत्साहित करावे, शैक्षणिक प्रगतीबरोबरच कौशल्यविकास, खेळ-व्यायाम, संगीत, कला, व्यक्तिमत्व विकास याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता पुन्हा जिद्दीने यश खेचून आणले पाहिजे. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर प्रगतीची दारे बंद होत नाहीत. प्रगतीची दारे खुली करण्याची हिम्मत असली पाहिजे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थी उज्ज्वल भविष्य घडवतील त्याचप्रमाणे अनुत्तीर्ण विद्यार्थीही जिद्दीने प्रगती करतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. यशवंत व्हा ! गुणवंत व्हा ! किर्तिवंत व्हा !  शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यशवंत व्हा ! गुणवंत व्हा ! किर्तिवंत व्हा ! सर्व दहावीत उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व पूढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. 
मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुभेच्छा देताना म्हटलं आहे की, शैक्षणिक आयुष्यातील महत्वाचा टप्पा असणारी 10 वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन! उज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, दहावीच्या सर्व यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींचं हार्दिक अभिनंदन! या प्रयत्नात यशस्वी न झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये. १० वीची परीक्षा हे अंतिम उद्दिष्ट नसतं. नव्या जोमाने अधिक प्रयत्न करुन यशस्वी व्हा. त्यासाठी शुभेच्छा.
242 विद्यार्थ्यांना 100 टक्के या निकालात तब्बल 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. 242 पैकी 100 टक्के गुण मिळवणारे 151 विद्यार्थी फक्त लातूर विभागातले आहेत.  कोकण विभागाचा निकाल जरी सर्वधिक असला तरी 100 टक्के गुण मिळवणारे 151 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. यात नाशिक विभागातील एकही विद्यार्थी नसून फक्त 2 विद्यार्थी मुंबई विभागातील आहेत.2017 साली 193 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले होते. तर 2018 साली 125 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले होते. तर गेल्यावर्षी केवळ 20 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले होते.  8360 शाळांचा निकाल 100 टक्के राज्यातील 22570 शाळांमधून 1754367 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 8360 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. या निकालात तब्बल 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तर एकूण 60 विषयांची परीक्षा घेण्यात आली, त्यामध्ये 20 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 93.90 टक्के मुलांनी बाजी मारली आहे. यंदा 3.1 टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त लागला आहे. तर कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. Maharashtra SSC Results | दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के, यंदाही मुलींची बाजी कोकण विभाग अव्वल सर्व विभागीय मंडळांमधून नियमित विद्यार्थ्यांमध्ये कोकण विभागाचा निकाल (98.77 टक्के) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा (92 टक्के) आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 92.73 टक्के दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 92.73 टक्के लागला आहे.राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 539373 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, 550809 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 330588 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, 80335 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. SSC Results 2020 Highlights : निकालात मुलींचीच सरशी, जाणून घ्या दहावीच्या निकालासंदर्भात दहा महत्वाचे मुद्दे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप जास्त निकाल मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी खूप जास्त निकाल लागला आहे. मागच्या वर्षी 77.10 टक्के निकाल होता. अंतर्गत मूल्यमापन , तोंडीपरीक्षा, कृतीपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुण यामुळे यावर्षी जास्त निकाल लागला, असं मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितलं.मार्च 2020 चा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च 2019 च्या निकालाच्या तुलनेत 18.20 टक्के जास्त आहे. खासगीरित्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 42309 एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 73.75 आहे. पुणे - 97.34 टक्के नागपूर - 93.84 टक्के औरंगाबाद - 92 टक्के मुंबई - 96.72 टक्के कोल्हापूर - 97.64 टक्के अमरावती - 95.14 टक्के नाशिक - 93.73 टक्के लातूर - 93.09 टक्के कोकण - 98.77 टक्के MAH SSC Result 2020 LIVE | महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, निकालात कोकण विभाग अव्वल निकाल कुठे आणि कसा पाहाल? दरम्यान विद्यार्थ्यांसाठी एक वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येईल. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकता. या वेबसाईटवर निकाल पाहता येणार? www.mahresult.nic.in www.maharashtraeducation.com कसा पाहाल निकाल? दहावीचा निकाल पाहाण्यासाठी वरील वेबसाईटवर लॉगऑन करता. इथे निकाल पाहण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील. समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल. त्यानंतर निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

पन्नासाव्या वर्षी बारावी उत्तीर्ण, मुंबईतील महिलेच्या जिद्दीची कहाणी

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
Embed widget