एक्स्प्लोर
SSC Results 2020 Highlights : निकालात मुलींचीच सरशी, जाणून घ्या दहावीच्या निकालासंदर्भात दहा महत्वाचे मुद्दे
Maharashtra SSC Results 2020 Highlights : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा (Maharashtra SSC Results 2020 Declared) निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in/ एक वाजता विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात.जाणून घेऊयात या निकालातील महत्वाच्या बाबी....

मुंबई : अखेर महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर (Maharashtra SSC Results 2020 Declared) झाला आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 17 लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती, अखेर आता ही उत्सुकता संपली आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in/ विद्यार्थी एक वाजता हा निकाल पाहू शकतील. राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 93.90 टक्के मुलांनी बाजी मारली आहे. यंदा 3.1 टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त लागला आहे. तर कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
निकालातील दहा महत्वाच्या बाबी
- परीक्षेला राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 1584264 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1574103 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि 1501105 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 95.30 आहे.
- या परीक्षेला राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 181565 फेरपरीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1792264 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 135991 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी 75.86 टक्के आहे.
- सर्व विभागीय मंडळांमधून नियमित विद्यार्थ्यांमध्ये कोकण विभागाचा निकाल (98.77 टक्के) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा (92 टक्के) आहे.
- सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 96.91 टक्के असून विद्यार्थ्यांचा निकाल 93.90 टक्के आहे. म्हणजे मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.01 टक्क्यांनी जास्त आहे.
- दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 92.73 टक्के लागला आहे.
- एकूण 60 विषयांची परीक्षा घेण्यात आली, त्यामध्ये 20 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
- राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 539373 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, 550809 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 330588 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, 80335 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत.
- मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी खूप जास्त निकाल लागला आहे. मागच्या वर्षी 77.10 टक्के निकाल होता. अंतर्गत मूल्यमापन , तोंडीपरीक्षा, कृतीपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुण यामुळे यावर्षी जास्त निकाल लागला, असं मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितलं.
- राज्यातील 22570 शाळांमधून 1754367 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 8360 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
- मार्च 2020 चा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च 2019 च्या निकालाच्या तुलनेत 18.20 टक्के जास्त आहे. खासगीरित्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 42309 एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 73.75 आहे.
पन्नासाव्या वर्षी बारावी उत्तीर्ण, मुंबईतील महिलेच्या जिद्दीची कहाणी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
























