एक्स्प्लोर

MAH SSC Result 2020 LIVE | महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, निकालात कोकण विभाग अव्वल

राज्यातील दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर (Maharashtra SSC Results 2020) होणार आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी एक वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येईल.

Maharashtra SSC result 2020 live updates MAH SSC Result 2020 LIVE | महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, निकालात कोकण विभाग अव्वल

Background

पुणे : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. आज बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनची विद्यार्थ्यांची आणि पालकांची आता प्रतीक्षा संपली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी तर 7 लाख 89 हजार 894 विद्यार्थीनी होत्या. राज्यातील एकूण 22 हजार 586 माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. तर 4979 परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.
विद्यार्थ्यांना बोर्डाच्या  www.mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर दहावीचा निकाल पाहता येईल.

यावर्षी दहावीची लेखी परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च या काळात आयोजित करण्यात आली होती. दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर होता. पण कोरोनाची वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे हा पेपर रद्द करण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केला. 24 मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे तर उत्तरपत्रिका पोस्टामध्येच अडकून पडल्या होत्या. लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि त्यांचं विभागीय मंडळांमध्ये संकलन हे एक मोठं आव्हान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळापुढे होतं. त्यातच दहावी भूगोलाचा पेपर न झाल्यामुळे दहावीच्या विषयांचं गुणदान कसं करायचं हा एक मोठा प्रश्न मंडळापुढे होता. अखेर त्याचाही निर्णय झाला. बाकीच्या विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून त्याचं रुपांतर हे रद्द झालेल्या भूगोल पेपरच्या गुणांमध्ये करण्यात येणार असल्याचं जाहीर झालं. यामुळे दहावीच्या गुणदानाचा तिढा सुटला. मागच्या वर्षी 8 जूनला दहावीचा निकाल लागला होता.

13:01 PM (IST)  •  29 Jul 2020

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा (Maharashtra SSC Results 2020 Declared) निकाल जाहीर झाला आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 17 लाख विद्यार्थ्यांची उत्सुकता संपली आहे. राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. मागच्या 15 वर्षांतला हा सर्वाधिक निकाल असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या निकालात तब्बल 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. 242 पैकी 100 टक्के गुण मिळवणारे 151 विद्यार्थी फक्त लातूर विभागातले आहेत.
13:44 PM (IST)  •  29 Jul 2020

या निकालात तब्बल 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. 242 पैकी 100 टक्के गुण मिळवणारे 151 विद्यार्थी फक्त लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल जरी सर्वधिक असला तरी 100 टक्के गुण मिळवणारे 151 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. यात नाशिक विभागातील एकही विद्यार्थी नसून फक्त 2 विद्यार्थी मुंबई विभागातील आहेत.2017 साली 193 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले होते. तर 2018 साली 125 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले होते. तर गेल्यावर्षी केवळ 20 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले होते.
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Climate Week India 2026: हवामान सुरक्षेसाठी अन् पर्यावरणासाठी मोठा उपक्रम; ‘क्लायमेट वीक इंडिया’मध्ये पुण्यात खास कार्यक्रमांचे आयोजन
हवामान सुरक्षेसाठी अन् पर्यावरणासाठी मोठा उपक्रम; ‘क्लायमेट वीक इंडिया’मध्ये पुण्यात खास कार्यक्रमांचे आयोजन
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
Devendra Fadnavis on Maharashtra Drought: मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, निकषांत न बसणाऱ्या तालुक्यांनाही मिळणार मदत; देवेंद्र फडणवीस म्हणाले..
मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, निकषांत न बसणाऱ्या तालुक्यांनाही मिळणार मदत; देवेंद्र फडणवीस म्हणाले..
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे पाच वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे पाच वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
Gold : दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
Ketan Agrawal and Siya Goyal : वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
India Alliance on SIR Meeting: इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
Ketan Agrawal Case : साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
Embed widget