(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आता तिसरीपासून सराव परीक्षा, राज्याच्या शालेय शिक्षणात केरळ पॅटर्न राबविणार
Kerala Education Pattern : राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी केल्या जाणाऱ्या राज्य सरकारच्या प्रयत्नात केरळ पॅटर्न त्यासोबतच पंजाब आणि राजस्थान मॉडेल एकत्र आणून शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याचं काम केलं जाईल.
मुंबई : राज्यातील शिक्षण विभागात आता केरळ पॅटर्न (Kerala Education Pattern) राबविण्यात येणार आहे. केरळ सोबत राजस्थान आणि पंजाब या राज्यातील शिक्षणातील पॅटर्न मधील यशस्वी प्रयोग सुद्धा राज्यात राबवले जाणार आहेत. राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी शिक्षण विभाग इतर राज्यातील यशस्वी प्रयोग राज्यातील शिक्षणात राबवण्याच्या तयारीत आहे. केरळ पॅटर्न लागू केला तर पुढील वर्षापासून तिसरीच्या विद्यार्थांची वार्षिक सराव परीक्षा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील वर्गांच्या परीक्षा घेण्यात येतील.
महाराष्ट्रातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी शिंदे फडणवीस सरकार विशेष प्रयत्न करत आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची टीम देशातील अशा राज्यात गेली जिथे शिक्षणात नवीन प्रयोग केले जाताय. ज्या राज्यांनी शिक्षणात प्रगती झाली आहे त्या राज्यातील पॅटर्न महाराष्ट्राच्या शिक्षणामध्ये राबविण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यामध्ये केरळ पॅटर्नवर विशेष काम केलं जाईल. सोबतच राजस्थान आणि पंजाब मधील मॉडेलचा देखील विचार यामध्ये केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
कोरोनानंतर महाराष्ट्रातील शिक्षणाचा दर्जा या तीन-चार राज्यांच्या तुलनेत खालवलेला आहे, असे तज्ञ्ज्ञांचे मत आहे. सोबतच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय असल्यामुळे विद्यार्थी गांभीर्याने परीक्षेला सामोरे जात नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचा पॅटर्न राबवल्यानंतर शिक्षणासोबत कला, विज्ञान विषयाच्या गुणवत्तेत वाढ होईल असा विश्वास शिक्षण विभागाला आहे.
राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी केल्या जाणाऱ्या राज्य सरकारच्या प्रयत्नात केरळ पॅटर्न त्यासोबतच पंजाब आणि राजस्थान मॉडेल एकत्र आणून शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याचं काम केलं जाईल. मात्र अशा प्रकारचे पॅटर्न राबवताना त्याचा कितपत फायदा राज्यातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना होतो? हा पॅटर्न राज्यात कसा राबविला जातो? की फक्त कागदावरच राहतो हे येणाऱ्या काळात कळलेच.
केरळ पॅटर्न आहे कसा ?
केरळ पॅटर्नमध्ये प्राथमिक शाळा चालवण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना तर माध्यमिक शाळा चालवण्याच्या अधिकार जिल्हा परिषदेला आहेत. प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेतली जाईल. कमी गुण मिळाल्यास त्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाते.
दर दहा वर्षांनी अभ्यासक्रमात बदल केला जातो.
विभागीय स्तरावर कला विज्ञान मिळावे घेतले जातात. सोबतच विद्यार्थी लेखकास प्रोत्साहन दिले जाते.
प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक व पालकांचे असोसिएशन आहे.
मातृभाषेतील शिक्षणाला विशेष प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे या केरळ पॅटर्न मधील महत्त्वाच्या बाबी महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात लागू करून केरळ सोबत राजस्थान आणि पंजाब मधील नवीन प्रयोग अवलंबले जातील.
महत्वाच्या बातम्या
Nagpur : दलालांची सुट्टी! आता शाळेतूनच मिळणार विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे; नागपुरात तालुका स्तरावर समिती
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI