ISRO चा विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑनलाइन कोर्स, प्रमाणपत्र ही मिळणार; असा करा अर्ज
ISRO Free Course : 10 वर्षावरील विद्यार्थ्यांसाठी इस्रोने एक मोफत ऑनलाइन कोर्स सुरू केला आहे.
ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO)विद्यार्थ्यांसाठी खास ऑनलाइन कोर्स सुरू केला आहे. अंतराळ विज्ञान, माहिती-तंत्रज्ञान विषयात रस असणाऱ्या विद्यार्थ्यांना हा कोर्स करता येईल. हा ऑनलाइन कोर्स मोफत आहे. जाणून घ्या या विशेष कोर्स बाबत...
इस्रोन विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑनलाइन कोर्सची घोषणा केली आहे. Overview of Space Science and Technology असे या कोर्सचे नाव आहे. या कोर्सच्या माध्यमातून अंतराळ विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत विविध पैलूंची माहिती दिली जाणार आहे. हा कोर्स Indian Institute of Remote Sensing (IIRS) च्यावतीने संचलित करण्यात येत असून Massive Open Online Course (MOOC) चा एक भाग आहे.
कोर्सची सुरुवात कधीपासून?
Overview of Space Science and Technology या कोर्सची सुरुवात 6 जूनपासून होणार आहे. हा कोर्स 5 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. या कोर्सचा अवधी 10 तासांचा आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतील व्हिडिओदेखील पाहता येणार आहेत. विद्यार्थ्यांना विषय अधिक चांगल्या प्रकारे समजावा यासाठी हे व्हिडिओ असणार आहेत. विद्यार्थ्याने व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रश्नोत्तरे होतील.
अर्ज कोण करू शकतील?
हा मोफत ऑनलाइन कोर्स भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांसाठी आहे. या कोर्समध्ये 10 वर्षावरील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
असा करा अर्ज
या अभ्यासक्रमात भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंगच्या (आयआयआरएस) (https://isat.iirs.gov.in/mooc.php) या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तिथे जाऊन नोंदणी करावी लागेल. ई-मेलवर मिळालेल्या क्रेडेन्शियल्सद्वारे सत्राला उपस्थित राहता येईल. नोंदणीसाठी इथे क्लिक करा
देशातील नामवंत अंतराळ शास्त्रज्ञ कोर्समध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.
हा कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला प्रमाणपत्रदेखील दिले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्याची या कोर्सला 70 टक्के उपस्थिती असेल आणि प्रश्नोत्तरात किमान 60 टक्के गुण मिळाले असतील, अशा विद्यार्थ्यांना इस्रोचे प्रमाणपत्र मिळणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI