CBSE 12th Result 2020 | सीबीएसई 12 वी चा निकाल जाहीर; कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा गुणवत्ता यादी नाही
सीबीएसई 12वी चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांची ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावेळी मेरीट लिस्ट म्हणजेच गुणवत्ता यादी जाहीर होणार नाही.
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच CBSE सीबीएसईच्या बारावी परीक्षेचा CBSE 12th Result 2020 निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी निकाल जाहीर करण्यासाठी बोर्डाकडून पत्रकार परिषद घेतली जाते आणि गुणवत्ता धारकांची यादी जाहीर केली जाते. मात्र यावेळी कोरोनाव्हायरस साथीमुळे सीबीएसई बारावी परीक्षेचा निकाल थेट वेबसाईटवर (http://cbseresults.nic.in/) जाहीर करण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावेळी मेरीट लिस्ट म्हणजेच गुणवत्ता यादी जाहीर होणार नाही. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनीही यासंदर्भात ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.
सीबीएसईकडून कालच 15 जुलै च्या आत दहावी-बारावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र कोणतीही तारीख जाहीर केली नव्हती. आज सीबीएसईच्या वेबसाईटवर निकाल इथे जाहीर केला जाईल असा तपशील सांगणारं CBSE Exam Result 2020 Results Will be announced here वेबपेज प्रकाशित झालं आहे. हे वेबपेज अपलोड करण्यासाठी सीबीएसईची वेबसाईट आजच अपडेट करण्यात आली आहे. त्यामुळेच आज निकाल जाहीर होण्याची शक्यता वाढली होती, त्यानुसार बारावीचा म्हणजे Senior School Certificate Examination (Class-XII) 2020 निकाल जाहीर करण्यात आला आहे.
आज बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे, दहावीचा निकालही आजच जाहीर करणार की त्यासाठी उद्या-परवापर्यंत थांबावं लागेल, हे अजून समजलेलं नाही. सीबीएसईकडून दोन्ही म्हणजे दहावी-बारावीचे निकाल 15 जुलैच्या आत जाहीर करण्याचं आश्वासन सर्वोच्च न्यायालयातही देण्यात आलं आहे.
निकाल पाहण्यासाठी काय कराल?
CBSE च्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी http://cbseresults.nic.in/
विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल http://cbseresults.nic.in/ आणि http://results.gov.in/ या वेबसाईट्ससोबतच एसएमएसवरून मिळवता येणार आहे. आयसीएई ICSE प्रमाणेच विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका डिजिटल स्वरुपात डिजिलॉकर मिळणार आहे. फक्त मार्कशीटच नाही तर मायग्रेशन सर्टिफिकेट आणि उत्तीर्ण प्रमाणपत्रही विद्यार्थ्यांना डिजिलॉकर मार्फत मिळणार आहे.
सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आल्या होत्या. देशभरातून तीस लाख विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा दिल्याचं सांगितलं जातं.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI