मुंबई आयआयटीचे माजी विद्यार्थी 135 कोटी रुपयांचा निधी जमवून जागतिक दर्जाचे हॉस्टेल कॉम्प्लेक्स उभारणार
मुंबई आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांकडून 120 ते 135 कोटी निधी उभा करून जागतिक दर्जाचे हॉस्टेल कॉम्प्लेक्स उभारले जाणार आहे.
मुंबई : आयआयटी मुंबईच्या कॅम्पस परिसरात जागतिक दर्जाचे हॉस्टेल कॉम्प्लेक्स उभारण्याच्या कामाला मुंबई आयडीचे माजी विद्यार्थी हातभार लावणार आहेत. या हॉस्टेल कॉम्प्लेक्समध्ये साधारणपणे 1,000 ते 1,500 खोल्या असतील. संस्थेने त्यांच्या माजी विद्यार्थ्यांसह एक अभिनव भागीदारी करार आज केला आहे. आयआयटी मुंबईच्या आयआयटीबीए आणि आयआयटीबीएचएफ या माजी विद्यार्थ्यांशी भागीदारी असलेला हा प्रोजेक्ट असेल.
मुंबई आयआयटीमध्ये होणारा हा अशा प्रकारचा पहिलाच मोठा प्रोजेक्ट असणार आहे. ज्यामध्ये आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थी 120-135 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करतील आणि प्रकल्प नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये प्रमुख भूमिका घेतील. तसेच आयआयटीबीएए प्रामुख्याने निधी, डिझाइन तसेच प्रकल्पाच्या बांधकामाकडे लक्ष देईल. या महत्वाकांक्षी आणि अत्यंत आवश्यक प्रकल्पाद्वारे माजी विद्यार्थी आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये H7 आणि H8 च्या सध्याच्या ठिकाणी हे हॉस्टेल कॉम्प्लेक्स बांधण्यास मदत करतील.
गेल्या दोन दशकांदरम्यान, आयआयटी कॅम्पसमधील विद्यार्थ्यांची संख्या 3,000 वरून 10,000 पेक्षा जास्त झाली आहे आणि त्यांच्या राहण्याची पायाभूत सुविधा आणि राहणीमान सुधारण्याची एक अत्यावश्यक गरज आहे. त्यासाठीच हा महत्वाचा प्रोजेक्ट उभा राहणार आहे. आयआयटी मुंबईला निधी उभारण्यासाठी काही मर्यादा आहेत. या कॅम्पसमधील जुन्या वसतिगृहांमध्ये स्ट्रक्चरल समस्या आहेत आणि त्यामध्ये काही ठिकाणी पुन्हा बांधण्याची गरज आहे. आयआयटी मुंबईने त्याच्या शोधात पाठिंबा देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधला आहे. विनंतीला प्रतिसाद देत, स्वयंसेवकांचा एक गट नियोजन, निधी उभारणी आणि नवीन वसतिगृह संकुलाच्या अंमलबजावणीसाठी एकत्र आला आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI