(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wardha Crime : प्रेम करणं महागात पडलं! पित्याकडून आपल्या अल्पवयीन मुलीची हत्या
Wardha Crime News Latest Update : अल्पवयीन मुलीला प्रेम करणं चांगलंच महागात पडलं आहे. वर्धा जिल्ह्यात जन्मदात्या पित्यानंच आपल्या मुलीला प्रेम केल्यामुळं संपवल्याची घटना घडली आहे.
Wardha Crime News Latest Update : अल्पवयीन मुलीला प्रेम करणं चांगलंच महागात पडलं आहे. जन्मदात्या पित्यानंच आपल्या मुलीला प्रेम केल्यामुळं संपवल्याची घटना घडली आहे. वर्धा जिल्ह्यातील (Wardha News) दहेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत हमदापूर येथे बुधवारी 11 मे दुपारी पित्यानेच स्वतःच्या अल्पवयीन मुलीच्या प्रेम प्रकरणामुळे झालेल्या वादात लाकडी वस्तूने डोक्यावर गंभीर वार करून हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी पिता विलास पांडुरंग ठाकरे याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपीच्या मुलीचे गावातीलच एका युवकाशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये आरोपी पित्याने त्याच्या मुलीला तिच्या मामाच्या घरी वर्धा येथे पाठवले होते. दरम्यान अल्पवयीन मुलीचा प्रियकराने मुलीच्या मामाच्या घरून मुलीचे अपहरण केले होते. त्यामुळे युवकाविरुद्ध ऑक्टोबर 2021 मध्ये रामनगर पोलीस ठाण्यात अपहरणासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती.
त्यानंतर अल्पवयीन मुलगी आपल्या मामाच्या घरून परतली. आरोपी पिता आणि मृतक अल्पवयीन मुलगी यांच्यात नेहमी वाद-विवाद होत असायचे. 11 तारखेला देखील असंच काही घडलं. रात्री जेवणाच्या वेळी स्वयंपाकाची चव बिघडल्यावरून आरोपी आणि मुलीमध्ये वाद झाला होता अशीही माहिती मिळाली आहे. हा वाद बुधवारी 11 मे ला विकोपाला गेला आणि होत्याचं नव्हतं झालं. पित्याकडूनच अल्पवयीन मुलीची हत्या झाल्यानं गावासह परिसरात खळबळ उडाली आहे.
दहेगाव पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून आरोपी पिता विलास ठाकरेला अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोलंकी, उपविभागीय पोलिस अधिकारी पियुश जगताप, दहेगांव पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्यासह चमू दाखल झाली. दहेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Beed Crime: घरातून निघून गेल्याच्या कारणावरुन पत्नीचा खून; आष्टीमधल्या शेरी बुद्रुक इथली घटना