एक्स्प्लोर
Advertisement
शेकडो गुन्हे दाखल असलेल्या अट्टल दरोडेखोरांच्या मुसक्या सोलापूर पोलिसांनी आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल जप्त
सोलापुरातल्या फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरी आणि घरफोडी गुन्ह्यांच्या तपास कामासाठी बाबरचा शोध गेल्या दोन महिन्यापासून सुरु होता. त्याचवेळी हा गुन्हेगार त्याच्या एका साथीदारासह सोलापुरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली
सोलापूर : जानेवारी महिन्यात साताऱ्यातील फलटण येथील आयडीबीआय बँक फोडणारा अट्टल दरोडेखोर राजेंद्र शिवाजी बाबार याच्या मुसक्या सोलापूर पोलिसांनी आवळल्या आहेत. राजेंद्र बाबर याच्यावर सोलापुरसह महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापुर, नाशिक, औरंगाबाद आणि अहमदनगर आदी जिल्ह्यात विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कुख्यात गुन्हेगार असलेल्या राजेंद्र बाबर याच्यावर महाराष्ट्रातील विविध पोलिस ठाण्यात सुमारे 500 ते 600 दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी अशा प्रकराच्या गुन्ह्यांची नोंद आहे. सोलापुरातल्या फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरी आणि घरफोडी गुन्ह्यांच्या तपास कामासाठी बाबरचा शोध गेल्या दोन महिन्यापासून सुरु होता. त्याचवेळी हा गुन्हेगार त्याच्या एका साथीदारासह सोलापुरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचत अत्यंत शिताफीने त्यास अटक केली. या आधी त्यास पकडताना त्याच्या जवळील बेकायदेशीर अग्नीशस्त्रामधून गोळीबार केलेला होता. तसेच हिसंक आणि क्रुरपणे निसटुन जायचा. त्यामुळे त्याला सुरक्षित पकडणे व पळून जाण्याची कोणतीही संधी मिळू नये याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र सापळा रचत पोलिसांनी त्यास सोलापुरात अटक केली.
यावेळी आरोपी राजेंद्र बाबर आणि त्याचा साथीदार राजकुमार पंडीत विभुते यांच्याकडून पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल ही जप्त केला. हत्यारे, रोख रक्कम, कार यासंह अनेक साहित्य जप्त करत 55 लाख 57 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल आरोपी बाबर याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. दरम्यान 24 आणि 25 जानेवारी दरम्यान फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत आयडीबीआय बँक फोडून रोकड व सोने तारण असलेले दागिने चोरी केल्याची कबुली देखील आरोपी बाबर याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी राजेंद्र बाबर, त्याचा भाऊ महेश बाबर, राजकुमार विभुते या तिघांनी मिळुन ही चोरी केल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. तिन्ही सराईत गुन्हेगारांनी चेहरा झाकण्यासाठी आणि हाताचे ठसे येऊ नये म्हणून मास्क आणि हँण्डग्लोजचा वापर करुन आधुनिक कटावणीच्या तसेच गाडीच्या जॅकच्या साहाय्याने आयडीबीआय बँकेचे खिडकीचे गज कापून कमी वेळात ही चोरी केली होती.
आधुनिक कटरने कुलुप तोडून आत प्रवेश करत ऑक्सिजन आणि गॅस कटरच्या सहाय्याने बँकेतील तिजोरीचा दरवाजा कापून त्यामध्ये सोने तारणासाठी बँकेत जमा असलेले 79 लाख 9 हजार किमतीचे 2 किलो 640 ग्रँम वजनाचे दागिने देखील चोरले होते. या धाडसी चोरीमुळे साताऱ्यात खळबळ उडाली होती. आरोपी राजेंद्र बाबर याने केलेल्या गुन्हेगारी कृत्यातून स्थावर मालमत्ता, जमीन, प्लॉट देखील खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अजून देखील काही गुन्हे चौकशीत पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
Bunty Babli Arrested | विकासकाच्या ऑफिसमध्ये चोरी करणारी बंटी-बबलीची जोडी अटकेत
संबंधित बातम्या :
मुंबईत हेल्मेटधारी चोरांचा सुळसुळाट; एकट्यावृद्ध महिलांना करतात टार्गेट
पगार दिला नाही म्हणून कामगाराचा मालकावर गोळीबार, आरोपी गजाआड
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement