मुंबईत हेल्मेटधारी चोरांचा सुळसुळाट; एकट्यावृद्ध महिलांना करतात टार्गेट
हेल्मेट धारी टोळी सराईत टोळी आहे. कोणत्या भागांत वृद्ध महिला किंवा पुरूष एकटे राहतात. ज्यांना लुटल्यावर मोठी कमाई होऊ शकते, याची चोर रेकी करतात. वेळ बघून चेहरा लपवण्याकरता हेल्मेट घालून घरात शिरून वृद्धांना मारहाण करून जखमी करतात.
मुंबई : मुंबईत हेल्मेट धारी चोरांनी हैराण केलं आहे. या हेल्मेट धारी चोरांच्या टार्गेटवर असतात वृद्ध महिला. ज्या घरात वृद्ध महिला एकट्याच राहतात किंवा एकट्या आहेत. अशा वृद्ध महिलांना ही गँग टार्गेट करते. त्या महिलांच्या घरात घुसून लुटायचे, तसेच त्यांना मारहाण करून गंभीर जखमी करतात. त्यामुळे वृद्धांमध्येही हेल्मेटधारी गँगची भिती पसरली आहे.
मुंबईतील कोकण नगर जोगेश्वरी पुर्व येथे एकट्या राहणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या घरात अचानक 3 हेल्मेटधारी चोर शिरले. महिलेला काही कळायच्या आतच तिच्या गळ्यावर चाकू ठेवून गळ्यातील 12 ग्रॅमची सोन्याची चैन आणि सॅमसंग कंपनीचा मोबाईल घेऊन फरार झाले. चोरांना महिलेने विरोध केल्यामुळे त्यांनी हातातील चाकूने महिलेला गंभीर जखमी केलं. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी महिलेला बेदम मारहाणही केली. ज्यामध्ये वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे.
पाहा व्हिडीओ : क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या सासुरवाडीत चोरी
हेल्मेट धारी टोळी सराईत टोळी आहे. कोणत्या भागांत वृद्ध महिला किंवा पुरूष एकटे राहतात. ज्यांना लुटल्यावर मोठी कमाई होऊ शकते, याची चोर रेकी करतात. वेळ बघून चेहरा लपवण्याकरता हेल्मेट घालून घरात शिरून वृद्धांना मारहाण करून जखमी करतात. यााधीही हेल्मेटधारी चोरांनी मुंबई उपनगरात अनेक वृद्धाना लुटलं आहे. हेल्मेटधारी चोरांची मोठी टोळी असून यांतील एकाला अटकही करण्यात आली आहे.
मुंबईतील वृद्धांवर हल्ल्याचे पुन्हा प्रमाण वाढत आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये अनोळखी व्यक्तींकडून जवळपास 5 ते 6 वृद्धांवर हल्ला करून त्यांना लुटण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी हेल्मेट धारी टोळीच्या एका चोराला अटक केली आहे. ज्याच्या दुसऱ्या साथीदाराला अशाच एका प्रकरणात नुकतीच अटक झाल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे. याचाच अर्थ अटक होऊन तुरुंगवारी करुन पुन्हा बाहेर आल्यावर हे चोर पुन्हा वृद्धांना लूटतात म्हणजेच, या हेल्मेट धारी चोरांनी कायद्याचा धाक उरलाच नाही हे स्पष्ट होत आहे.
संबंधित बातम्या :
पुण्यात शेजारणीकडे घराची चावी ठेवणं महागात; बनावट चावीद्वारे लाखो रुपयांवर डल्ला
पगार दिला नाही म्हणून कामगाराचा मालकावर गोळीबार, आरोपी गजाआड