औरंगाबादमध्ये ऑनलाईन IPL सट्टा सेंटर पोलिसांकडून उद्ध्वस्त; नोकरी गेल्यानं शिक्षिका करत होत्या कॉल सेंटरवर काम
औरंगाबाद सिटीचौक पोलिसांची रोजा बागेत कारवाई, सात महिला, 10 पुरुष पोलिसांच्या ताब्यात.या कारवाई दरम्यान ताब्यात घेतलेल्या महिला कधीकाळी ज्ञानदानाचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
औरंगाबाद : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा खेळविणाऱ्या कॉल सेंटरचा पोलिसांनी गुरुवारी रात्री धाड टाकून पर्दाफाश केला. या कारवाईत कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या 10 पुरुष आणि 7 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडुन 52 मोबाईल, लॅपटॉप, एल ईडी टिव्ही, मोबाईल चार्जर, रोख रक्कम आणि अन्य साहित्य जप्त केले.
या कारवाईविषयी सिटीचौक पोलिसांनी सांगितले की, आयपीएल क्रिकेट सामन्यावर चालणाऱ्या ऑनलाईन सट्ट्याच्या दोन कारवाया यापूर्वी शहरात झाल्या. या कारवाईनंतरही शहरातील रोजाबाग येथील इंतियाज कादरी यांच्या इमारतीतमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट भाड्याने घेऊन आयपीएल क्रिकेटचा ऑनलाईन सट्ट्याचे कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती खबऱ्याने पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांना दिली. या माहितीची खात्री केल्यावर आज रात्री पोपवार, सपोनि सय्यद, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर आणि कर्मचाऱ्यानी रोजाबागेत जाऊन धाड टाकली. तेव्हा तेथे 7 महिला आणि 10 पुरुष मोबाईलवर ऑनलाईन सट्टा बुकिंग करीत असल्याचे दिसले. तेथे लावण्यात आलेल्या टीव्हीवर आयपीएल क्रिकेट सामना सुरू होता. या कारवाईत ऑनलाईन बुकिंग करीता वापरण्यात येणारे 52 मोबाईल हॅण्डसेट, मोबाईल चार्जर, रोख रक्कम आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसानी दिली.
स्थानिक बुकीचा समावेशयावेळी पकडण्यात आलेल्या 10 पुरुषामध्ये नाविद नावाचा आरोपी स्थानिक मुख्य बुकी असल्याचे सुत्राने सांगितले. त्याची पोलीस अधिकारी कसून चौकशी करीत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. बहुतेक आरोपी परजिल्ह्यातील बुलढाणा आणि शेजारील जिल्ह्यातील जुगाऱ्यांना ऑनलाईन सट्टा खेळता यावा आणि पोलिसांची नजर यावर पडू नये याकरिता ऑनलाईन कॉल सेंटरवर काम करण्यासाठी बहुतेक लोक परजिल्ह्यातील आहेत. यात काही महिला शिक्षिकांचा समावेश आहे. त्यांनी मासिक वेतनावर घेण्यात आले होते. ताब्यात घेतलेल्या महिलाना कॉल सेंटर येथेच रात्रभर ठेवण्यात आले. उद्या त्यांना अटक केली जाणार आहे.
ताब्यात घेतलेल्या महिला कधीकाळी करत होत्या ज्ञानदानाचे काम
पोलिसांनी या कारवाई दरम्यान सात महिलांना ताब्यात घेतला आहे. या सर्व महिला शिक्षिका आहेत. लॉकडाऊनमुळे नोकरी केली. त्यामुळे त्यांनी सट्टा बाजारातील कॉल सेंटरला काम करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी सात महिलांना ताब्यात घेण्यात आलं. त्यातल्या दोन महिलांकडे लहान बाळं सुद्धा होती. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानंतर या महिलांना कॉल सेंटरवर काम करण्याची वेळ आली आहे.
#Crime तीन हजार रुपयांसाठी मित्राची हत्या, मित्र अनिकेत दीक्षित पोलिसांच्या ताब्यात, पुण्यामधील घटना