(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Netflix वापरताय? वेळीच सावध व्हा, नाहीतर तुम्हीही Phishing Scam चे शिकार व्हाल
Netflix Phishing Scam Warning : Netflix वापरत असाल तर जरा सावध व्हा. नाहीतर तुम्हीही Phishing Scam चे शिकार व्हाल.
Netflix Phishing Scam Warning : सध्याचं युग हे सोशल मीडियाचं युग आहे असं म्हटलं जातं. पण सध्या हेच सोशल मीडिया मायाजाल असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक युजर्स OTT प्लेटफॉर्म्सचा सर्रास वापर करत असल्याचं पाहायला मिळत आहे. लोकांची या प्लॅटफॉर्म्सना खूप पसंती मिळत असून त्यावर पॅड मेंबरशिप देखील घेत आहेत. अशातच सध्याच्या सर्वात लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म्सपैकी एक प्लॅटफॉर्म म्हणजे, Netflix. पण या प्लॅटफॉर्मवर होत असलेल्या एका फिशिंग स्कॅमनं (Phishing Scam) युजर्सना विचार करायला भाग पाडलं आहे. आतापर्यंत केवळ मनी ट्रांजॅक्शन करणाऱ्या अॅप्सबाबत तुम्ही हे ऐकलं असेल, परंतु, नेटफ्लिक्स (Netflix) ऑनलाईन फसवणुकीपासून दूर राहिलेलं नाही. अशातच सध्या एक नवा फिशिंग घोटाळा (Netflix Phishing Scam) समोर आला असून ज्यामार्फत युजर्सी डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जातोय.
या घोटाळ्याचा फटका अनेकांना बसला असून एकाच महिन्यात किमान पाच जणांना तब्बल 12,500 डॉलर्सचं (सात लाख रुपयांहून अधिक) नुकसान सहन करावं लागलं आहे. सिंगापूर पोलिसांनी लोकांना नेटफ्लिक्सशी जोडलेल्या स्पूफ ईमेलसह फिशिंग स्कॅमबाबत सतर्क केलं होतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा मेल कोणत्याही सुरक्षा भेदून युजर्सपर्यंत पोहोचण्यास सक्षम आहे, त्यामुळे असे घोटाळे होत आहेत.
पोलिसांचं म्हणणं काय?
पोलिसांनी सांगितलं की, घोटाळे करणारे युजर्सना त्यांची मेंबरशिप रिन्यू करण्यासाठी URL लिंक पाठवतात आणि त्या लिंकवर क्लिक करण्यासाठी भाग पाडतात. युजर्स जसे या लिंकवर क्लिक करतात, ते फिशिंग वेबसाईटवर रीडायरेक्ट केले जातात. युजर्सना त्यांची क्रेडिट किंवा डेबिट कार्ड माहिती आणि त्यांची मेंबरशिप रिन्यू करण्यासाठी ओटीपी (OTP) टाकण्यास सांगतात. युजर्स जशी सर् माहिती भरतात, हॅकर्स ती सर्व माहिती चोरतात आणि युजर्सच्या कार्डानं व्यवहार करतात. त्यामुळे नेटफ्लिक्सचा असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही स्पूफ ईमेलवर क्लिक करू नका, असं आवाहन वारंवार पोलिसांकडून केलं जात आहे.
Netflix Phishing Scam पासून कसा बचाव कराल
- संशयास्पद ईमेल आणि टेक्स्ट मेसेजमध्ये देण्यात आलेल्या URL वर कधीच क्लिक करु नका.
- नेहमी अधिकृत वेबसाइटवरून माहितीची सत्यता तपासा.
- पडताळणी करण्यापूर्वी तुमचे वैयक्तिक किंवा इंटरनेट बँकिंग तपशील आणि ओटीपी कोणावरही किंवा कोणत्याही लिंकवर टाकू नका.
- कोणत्याही फसव्या क्रेडिट/डेबिट कार्डच्या बाबतीत तुमच्या बँकेशी संपर्क साधा आणि तुमचे कार्ड त्वरित ब्लॉक करा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Netflix : नेटफ्लिक्स अकाऊंटचा पासवर्ड शेअर करताय? आता द्यावं लागणार अधिक शुल्क, लवकरच येणार नवं फिचर
- Netflix : नेटफ्लिक्सचा सबस्क्रिप्शन प्लॅन आणखी स्वस्त; Netflixची Microsoftसोबत हातमिळवणी, स्वस्त OTT प्लॅन आणण्याची तयारी
- Netflix : 'नेटफ्लिक्स' तोट्यात... 300 कर्मचार्यांना कामावरून काढलं
- Netflix Subscribers : नेटफ्लिक्सला मोठा झटका, नऊ लाखांहून अधिक युजर्स गमावले