Netflix Subscribers : नेटफ्लिक्सला मोठा झटका, नऊ लाखांहून अधिक युजर्स गमावले
Netflix Subscriber Loss : नेटफ्लिक्स कंपनी सध्या तोट्यात आहे. नवीन प्रेक्षकांना आकर्षिक करताना नेटफ्लिक्सने 9 लाखांहून अधिक युजर्स गमावले आहेत.
Netflix Loses Subscribers : अलिकडच्या काळात ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सला (Netflix) घरघर लागली आहे. नेटफ्लिक्स कंपनीला मोठं नुकसान झालं आहे. कंपनीने पुन्हा एकदा नऊ लाख युजर्स गमावले आहेत. गेल्या तिमाहीमध्ये नऊ लाख युजर्सनी नेटफ्लिक्सकडे पाठ फिरवली आहे. नेटफ्लिक्सने एप्रिल ते जून महिन्यापर्यंत 9 लाख 70 हजार युजर्स गमावले आहेत. नेटफ्लिक्स कंपनी तोट्यात असल्यामुळे कंपनीकडून नवीन प्रेक्षकांना आकर्षिक करण्याच जोरदार प्रयत्न सुरु आहे. पण या प्रयत्नात नेटफ्लिक्सने जुने ग्राहक मात्र गमावले आहेत.
नेटफ्लिक्स कंपनी गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी नेटफ्लिक्सकडून वेगवेगळे उपाय करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर नेटफ्लिक्सने अनेक कर्मचाऱ्यांनाही कामावरून कमी केलं आहे. 2021 वर्षाच्या शेवटपर्यंत नेटफ्लिक्सने जगभरात 2 लाख युजर्स गमावले.
पासवर्ड शेअरिंगमुळे नेटफ्लिक्स कंपनीला मोठं नुकसान
नेटफ्लिक्सच्या एका अकाऊंट आणि पासवर्डचा वापर अनेक युजर्स करत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. पासवर्ड शेअरींगमुळे कंपनीच्या सबस्क्रायबर्समध्ये दशकातील सर्वात मोठी घट झाली आहे.
एप्रिलमध्ये सबस्क्रायबर्समध्ये मोठी घट
एप्रिल महिन्यामध्ये सबस्क्रायबर्समध्ये मोठी घट झाल्याची नेटफ्लिक्स कंपनीने सांगितलं आहे. ही दशकातील सर्वात मोठी घट आहे. यामुळे वॉल स्ट्रीटवर मोठा परिणाम झाला. शेअर बाजारात नेटफ्लिक्सच्या गुंतवणूकदारांना अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झालं आहे. या वर्षी कंपनीचा स्टॉक अंदाजे 70 टक्क्यांनी घसरला आहे. नेटफ्लिक्सकडे सध्या 221.6 दशलक्ष सबस्क्रायबर्स आहेत.
नेटफ्लिक्सची मायक्रोसॉफ्टसोबत हातमिळवणी
नेटफ्लिक्स आता स्वस्त OTT स्ट्रिमिंग प्लॅन आणण्याच्या तयारीत आहेत. यासाठी नेटफ्लिक्सने आता मायक्रोसॉफ्टसोबत (Microsoft) हातमिळवणी केली आहे. नेटफ्लिक्स जाहिरातीसह (Ad-Support) असलेल्या सबस्क्रिप्शनसाठी (Subscription Plan) मायक्रोसॉफ्टसोबत भागीदार करणार आहे. नेटफ्लिक्स कंपनीनं सांगितलं आहे की, मायक्रोसॉफ्ट जागतिक तंत्रज्ञा आणि विक्रीमध्ये मदत करेल. नेटफ्लिक्सने एप्रिल महिन्यात अॅड सपोर्ट सबस्क्रिप्शन प्लॅनची घोषणा केली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या