Nashik Crime: शाळेतून घरी जाणाऱ्या मुलीला गाठलं, एकानं मोबाईल नं लिहून दिला, फोन कर म्हणून दम दिला, दुसऱ्यानं.., नाशकातील धक्कादायक प्रकार
अल्पवयीन मुलीला अशा प्रकारे छेडछाडीचा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Nashik Crime: राज्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रकार वाढतानाचे चित्र आहे. वाढत्या गुन्हेगारीने डोके वर काढले असून नाशकात शाळेतून घरी जाणाऱ्या मुलीची रिक्षातून आलेल्या दोघांनी वाट अडवली. कागदावर मोबाईल नंबर लिहून देत तिला फोन करण्यासाठी दम दिला. मोबाईलवर तिचा फोटो काढत छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. 24 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता घटना घडली. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने नाशकातील भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या दोन्ही आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. ज्या मोबाईलमधून फोटो काढला तो मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Nashik Crime)
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीने चांगलंच डोकं वर काढलं आहे. दारू ढोसून मारहाण, फसवणूक, धारदार शस्त्रानं वार करत खून, कोयते, लाठ्याकाठ्यांचे प्रकारही वाढत आहेत. दरम्यान, अल्पवयीन मुलीला अशा प्रकारे छेडछाडीचा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
नक्की घडले काय?
24 मार्च 2025 ला दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडलेली घटना आहे . शाळेतून घरी जात असताना नेहरू गार्डनच्या जवळ रिक्षातून आलेल्या दोन इसमान कडून छेडछाडीचा प्रयत्न झाला .यातील एका व्यक्तीने मुलीला एका कागदावर नंबर लिहून दिला .दुसऱ्या व्यक्तीने रिक्षातून तिचा फोटो काढला .या मोबाईल नंबर वरती फोन कर असा दम भरला .या मुलीने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केल्यानंतर भद्रकाली पोलीस ठाण्यातील पोलिसांनी मुस्तफा शेख आणि अरबाज पठाण या दोघांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे .संशयीतांकडून मोबाईल हस्तगत करण्यात आला असून ज्या रिक्षातून हे दोन्ही समाने त्या रिक्षाचा शोध सुरू आहे . ज्या मोबाईलमधून फोटो काढला तो मोबाईल पोलिसांनी जप्त किल्ल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी दिली .
चितेच्या राखेवर फळं, खिळे अन्...
नाशिकच्या (Nashik) मालेगाव (Malegaon) येथील श्रीरामनगर स्मशानभूमीत (Shriramnagar Cemetery) अघोरी कृत्य (Black Magic) उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अंत्यविधी झालेल्या महिलेच्या चितेच्या राखेवर दुधी भोपळा सदृश्य फळ ठेवून त्यावर पाच सहा ठिकाणी नागाच्या फणीच्या आकाराचे खिळे टोचून अघोरी प्रकार करण्यात आल्याचे दिसून आले. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील 75 वर्षीय जमुना बापू पाटील या मयत झाल्या. त्याच दिवशी दुपारी साडे तीन वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. तिसऱ्या दिवशी आज सकाळी राख सावडण्याच्या कार्यक्रमासाठी सर्व नातेवाईक स्मशान भूमीत आले असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
हेही वाचा:























