Mumbai Drugs Case : एनसीबीची धडक कारवाई, हायड्रोपोनिक विड, कोकेन आणि 2 लाखांची रोकड जप्त, तिघे अटकेत
Mumbai Drugs Case : मुंबईत एनसीबीच्या पथकाची धडक कारवाई. हायड्रोपोनिक विड, कोकेनसह 2 लाखांची रोकड जप्त करण्यात आली असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
Mumbai Drugs Case : मुंबईत (Mumbai NCB) पुन्हा एनसीबीनं धाड टाकर एक ड्रग्ज रॅकेट उध्वस्त केलं आहे. मुंबईतील अंमली पदार्थ पुरवठादार आणि पेडलर्स विरुद्ध नार्कोटिक कंट्रोल ब्युरो (Narcotics Control Bureau) मुंबई सतत लढत आहे. NCB मुंबईने 06 मे आणि 07 मे रोजी दोन ऑपरेशनमध्ये मुंबईतील विविध ठिकाणी छप्पा टाकून 445 ग्रॅम हायड्रोपोनिक वीड (गांजा), अल्प प्रमाणात कोकेन आणि 2 लाख 96 हजारांची रोकड जप्त केली आहे.
पहिल्या कारवाईत मिळालेल्या माहितीच्या आधारावर 225 ग्रॅम हायड्रोपोनिक वीड (गांजा) 6 मे रोजी मुंबईच्या परदेशी पोस्ट ऑफिसमध्ये जप्त करण्यात आला. हे पार्सल कॅनडातून इनबाउंड होतं. याप्रकरणाचा पुढे पाठपुरावा करताना, एनसीबी मुंबईच्या पथकानं 7 मे रोजी रात्री उशिरा मालाड येथे रिसीव्हरच्या घरावर छापा टाकून 220 ग्रॅम हायड्रोपोनिक विडसह 2 लाख 96 हजारांची रोकड जप्त केली. एनसीबी मुंबईनं याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
त्यानंतर मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे दुसऱ्या कारवाईत एनसीबी मुंबईनं मिरा रोड पूर्व येथे अल्प प्रमाणात कोकेन जप्त केलं आणि 6 मे रोजी सदर खेप स्विकारणाऱ्याला अटक केली. घटनास्थळी चौकशीच्या आधारे एनसीबी, बंगळुरूच्या पथकानं बंगळुरू येथे रिसीव्हरसाठी सापळा रचला. या कारवाईत अल्प प्रमाणात कोकेनसह एका आफ्रिकन पुरुषाला पकडण्यात एनसीबीच्या पथकाला यश आलं आहे. ड्रग्स जीन्सच्या पँटमध्ये विणलेल्या कुरिअरमध्ये आली होती. एनसीबी मुंबईनं याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांच्या नेतृत्त्वात एनसीबीच्या पथकानं कारवाई केली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Nashik : नाशिकमध्ये जातपंचायत आणि ग्रामपंचायतीचा अजब फतवा! आंतरजातीय विवाह केल्याने विवाहितेचे शासकीय योजनांचे लाभ नाकारले!
- Beed : माझ्या बायकोच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी खून करत राहणार; पोलिसांना आव्हान देत केला खून
- Washim News : धारदार शस्त्राने भोसकून पुजाऱ्याची हत्या, वाशिममधील घटनेने खळबळ