Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
The Great Honor Nishan of Ethiopia : भारत आणि इथियोपियामधील असलेले संबंध येत्या काळात अधिक बळकट करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना आणखी एक मोठा आंतरराष्ट्रीय सन्मान (International Honour) मिळाला आहे. आफ्रिकेतील इथियोपिया (Ethiopia) या देशाने पंतप्रधान मोदींना आपल्या सर्वोच्च नागरी सन्मान (Highest Civilian Award) ‘ग्रेट ऑनर निशान’ने (The Great Honor Nishan of Ethiopia) सन्मानित केले आहे. या सन्मानासह पंतप्रधान मोदींना आतापर्यंत जगभरातील विविध देशांकडून मिळालेल्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांची संख्या जवळपास 28 वर पोहोचली आहे.
हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान (PM Modi Statement)
इथियोपियाकडून मिळालेला सर्वोच्च सन्मान स्वीकारताना पंतप्रधान मोदींनी भावना व्यक्त करत सांगितले की, “हा माझा वैयक्तिक सन्मान नसून 140 कोटी भारतीयांचा सन्मान आहे. मी सर्व भारतीयांच्या वतीने हा सन्मान अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने स्वीकारतो.” हा सन्मान भारत-इथियोपिया भागीदारी घडवून आणणाऱ्या असंख्य भारतीयांचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुझे ‘Great Honour Nishan of Ethiopia’ के रूप में, इस देश का सर्वोच्च सम्मान प्रदान किया गया है।
— PMO India (@PMOIndia) December 16, 2025
विश्व की अति-प्राचीन और समृद्ध सभ्यता द्वारा सम्मानित किया जाना, मेरे लिए बहुत गौरव की बात है: PM @narendramodi
ग्लोबल साऊथमध्ये इथियोपियाची प्रेरणादायी भूमिका (Global South)
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज संपूर्ण जगाचे लक्ष ग्लोबल साऊथ (Global South) कडे लागलेले असताना, इथियोपियाची स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि आत्मगौरवाची चिरकालीन परंपरा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. भविष्य त्याच भागीदाऱ्यांचे असते, ज्या विश्वास आणि दीर्घकालीन दृष्टीकोनावर आधारित असतात, असेही त्यांनी नमूद केले.
भारत-इथियोपिया सहकार्य बळकट होणार (India-Ethiopia Relations)
भारत इथियोपियासोबत असलेले सहकार्य पुढे नेण्यास कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले, जे बदलत्या जागतिक आव्हानांवर उपाय देईल आणि नव्या संधींची निर्मिती करेल. विविध क्षेत्रांतील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
इथियोपियात पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत (PM Modi Ethiopia Visit)
जॉर्डनहून पहिल्या द्विपक्षीय दौऱ्यावर इथियोपियात पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींचे राजधानी अदीस अबाबा (Addis Ababa) येथे औपचारिक आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली (Abiy Ahmed Ali) यांनी स्वतः विमानतळावर उपस्थित राहून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.
दोन्ही पंतप्रधानांचा एकाच गाडीतून प्रवास (Diplomatic Gesture)
मैत्रीपूर्ण वातावरणाचे दर्शन घडवत, पंतप्रधान अबी अहमद अली यांनी पंतप्रधान मोदींना हॉटेलपर्यंत स्वतःच्या गाडीतून नेले. या प्रवासादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींना सायन्स म्युझियम आणि फ्रेंडशिप पार्क दाखवण्याची खास व्यवस्था केली, जी आधीच्या कार्यक्रमात समाविष्ट नव्हती.
भारतीय समुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद (Indian Community)
अदीस अबाबामध्ये पंतप्रधान मोदींच्या आगमनानंतर भारतीय समुदायाने मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले. तिरंगा फडकावत ‘मोदी मोदी’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीने भारावून गेला.





















