एक्स्प्लोर

Director Rob Reiner Wife Murder Case: सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई

Director Rob Reiner Wife Murder Case: पोलिसांकडून दिग्दर्शक आणि त्यांच्या पत्नीच्या खुनाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या चौकशीत संशयाची सुई वारंवार दिग्दर्शकाच्या थोरल्या मुलाकडेच जात होती

Director Rob Reiner Wife Murder Case: दिग्गज दिग्दर्शकाच्या (Director) मृत्यूच्या वृत्तानं खळबळ माजली आहे. सुप्रसिद्ध ऑस्कर नॉमिनेटेड दिग्दर्शक रॉब रेनर (Oscar Nominated Director Rob Reiner) आणि त्यांची पत्नी मिशेल सिंगर रेनर (Michele Singer Reiner) यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दिग्दर्शक रॉब रेनर (Rob Reiner) आणि त्यांची पत्नी दोघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. रॉब रेनर यांच्या कुटुंबीयांनी शोक व्यक्त करणारं निवेदन जारी केलं आहे. तसेच, कुटुंबीयांच्या प्रायव्हसीचं भान राखण्याचंही आवाहन केलं आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणी कसून चौकशी करत आहेत. तसेच, दिग्दर्शक आणि त्यांच्या पत्नीच्या खुनाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या चौकशीत संशयाची सुई वारंवार दिग्दर्शकाच्या थोरल्या मुलाकडेच जात होती, त्यामुळे पोलिसांनी दिग्दर्शक रॉब रेनर यांचा मुलगा निक रेनर याला अटक केली आहे. 

रॉब रेनर आणि त्यांची पत्नी मिशेल सिंगर रेनर यांची 14 डिसेंबर रोजी चाकूनं सपासप वार करून हत्या करण्यात आलेली. दोघांचेही मृतदेह त्यांच्या राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. पोलिसांकडून या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. अशातच या प्रकरणी वारंवार संशयाची सुई त्यांच्या मुलाकडेच येत होती, त्यामुळे पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली आहे. पीपल मासिकानं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, निकनं त्याच्या पालकांनी हत्या केली. दरम्यान, पोलिसांनी अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Director Rob Reiner and wife Michele Singer Reiner found dead at home | Movies | The Guardian

रॉब रेनर, मिशेल सिंगर रेनर यांनी 1989 मध्ये थाटलेला संसार (Rob Reiner Michele Singer Reiner Death)

78 वर्षीय रॉब रेनर आणि 68 वर्षीय मिशेल सिंगर रेनर यांच्या हत्येची माहिती सुरुवातीला गुप्त ठेवण्यात आली होती. पण, माध्यमांनी त्यांच्या मृत्यूच्या बातमीची पुष्टी केली. दोघेही राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. दोघांच्याही शरीरावर चाकूनं सपासप वार करण्यात आलेले. रॉब आणि मिशेल यांनी 1989 मध्ये लग्न केलं आणि त्यांना दोन मुलं झाली. रॉब यांनी हॉलिवूडमधील अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनय केला. त्यांनी 'व्हेन हॅरी मेट सॅली', 'मिसरी' आणि 'अ फ्यू गुड मेन' यासह अनेक गाजलेल्या सिनेमांचं दिग्दर्शन केलेलं.

मीडिया रिपोर्टनुसार, निक आणि त्याच्या वडिलांचे संबंध फारसे चांगले नव्हते. एका जुन्या मुलाखतीत निकनं कबूल केलेलं की, 2015 मध्ये आलेल्या 'बीइंग चार्ली' चित्रपटात त्याच्या वडिलांसोबत काम केल्यानंतर ते जवळ आलेते एकमेकांशी बोलू लागलेले. निकनं 'बीइंग चार्ली'ची कथा लिहिली आणि त्याच्या वडिलांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं. दरम्यान, निकनं दोघांचीही हत्या केली की नाही याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, निकला पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Actress Nivetha Pethuraj Wedding Called Off: पलाश-स्मृती पाठोपाठ प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार थाटण्यापूर्वीच मोडला? होणाऱ्या नवऱ्याला केलं अनफॉलो, साखरपुड्याचे फोटोही डिलीट

महत्त्वाच्या बातम्या

Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Ram Kadam On Tukaram Mundhe FDA Action On Pan Masala Ad: 'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget