Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
कोणी किती जागा लढायच्या यावरून अडलंय...? की कुणी कोणत्या जागा लढायच्या हे ठरत नाहीय..? काँग्रेसनं साथ सोडली तर मुस्लिम आणि दलित मतांचं काय करायचं, हे समजत नाहीय? की शरद पवार पत्ते उघड करत नसल्यामुळे गाडा पुढे सरकत नाहीय? असे एक ना अनेक प्रश्न ठाकरेंची शिवसेना - मनसेच्या कार्यकर्त्यांना... आणि ठाकरे बंधूंना मानणाऱ्या मराठी मतदाराला पडलेत... आणि त्यामागचं कारण म्हणजे महापालिका निवडणुकांची घोषणा होऊनही दोन्ही ठाकरे बंधूंकडून जाहीर होत नसलेली युती.. दोन्ही ठाकरे बंधू गरजेपेक्षा जास्त विलंब करतायत का? आणि या विलंबाची त्यांना नेमकी किती मोठी किंमत मोजावी लागू शकते? याच प्रश्नांचा आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा रिपोर्ट पाहुयात
गणपती आले नी गेले.. एकमेकांच्या बर्थडेचे केक कापून झाले.. कधी लग्नाच्या मांडवात चर्चा झाली..
तर कधी बारशाच्या कार्यक्रमात.. पण ठाकरे बंधूंकडून युतीच्या निर्णयावर काही शिक्कामोर्तब झालं नाही
शिवतीर्थ बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीसाठी मनसेच्या वतीनं स्वतः राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर.... तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं संजय राऊत आणि अनिल परब उपस्थित होते.. आता महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यात म्हटल्यानंतर, मनसे आणि ठाकरेंची शिवसेना युतीची ब्रेकिंग न्यूज देईल असं पत्रकारांना वाटलं.. मात्र बैठकीतून बाहर पडलेल्या अनिल परबांनी मीडियाचा भ्रमनिरास केला..
All Shows































