अनैसर्गिक संबंधासाठी आधी अपहरण, नंतर हात-पाय बांधून पाण्यात टाकलं; अल्पवयीन मुलाच्या खुनामुळे ठाण्यात खळबळ!
दहिसर परिसरातील एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
ठाणे : येथे हादरवून टाकणारी एक घटना घडली आहे. येथील दहिसर (Dahisar) परिसरातील एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अनैसर्गिक अत्याचार करण्यासाठी अपहरण करण्यात आले. राहत्या घरातून घेऊन जाऊन त्याचा नंतर खून (Minor Boy Mudere) करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्या आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. 25 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता मृत मुलाचे अपहरण करण्यात आले होते.
नेमकं पकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार मृत मुलाच्या आईने शिळ डायघर पोलीस ठाण्यात जाऊन मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. तक्रारदार महिलेचा मुलगा 12 वर्षीय मुलगा 25 मार्च रोजी घरातून बाहेर पडला होता. मात्र बराच वेळ झाला तरी तो परतला नव्हता. या महिलेने आपल्या मुलाचा शोध घेतला, परंतु तो सापडला नाही. शेवटी या महिलेने पोलिसांत मुलगा हरवल्याची तक्रार दिली.
हात पाय बांधून डबक्यात टाकले
दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी आपला तपास चालू केला. तपासादरम्यान हा मुलगा नवी मुंबई परिसरातील तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृतावस्थेत आढळला. आडीवली-किरवली गावाच्या हद्दीत असलेल्या एका पाण्याच्या डबक्यात या मुलाला त्याचे हात-पाय बांधून टाकून देण्यात आले होते. मुलाचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तक्रारदार महिलेशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.
या मुलाची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी वेगवेगळी पथके स्थापन करून तपास चालू केला. या प्रकरणी पोलिसांनी रमजान मोहम्मद कुद्दूस शेख आणि मोहम्मद आझाद कुद्दुस शेख या दोन आरोपींना अटक केली. तपासादरम्यान या दोन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
12 वर्षीय मुलाचा खून नेमका का केला?
पोलिसांनी केलेल्या तपासानुसार रमजान शेख आणि मृत मुलगा ठाकुरपाडा येथे एकाच परिसरात राहायचे. रमजान मृत मुलाला प्रलोभन दाखवून निर्जन स्थळी घेऊन गेला. तेथे आरोपींना मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाने विरोध केल्यामुळे आरोपीने त्याच्या डोक्यात दगड मारून त्याला बेशुद्ध केले आणि कपड्याने त्याचा गळा आवळला. यामध्ये मृत मुलाचा मृत्यू झाला.
मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी डबक्यात फेकून दिले
दरम्यान, मृत मुलाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रमजान शेख याने त्याचा भाऊ मोहम्मद शेख याला बोलावले. दोघांनीही मृत मुलाचे हात-पाय बांधून त्याला पाण्याच्या डबक्यात फेकून दिले. या गुन्ह्यात अन्य कोणाचा समावेश आहे का? याचा पोलीस शोध घेत आहेत.