(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RSSच्या रेशीमबाग परिसराची रेकी करणाऱ्या दहशतवाद्याचा महाराष्ट्र ATSनं घेतला ताबा
Nagpur RSS Reshim Baug डॉ हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणाऱ्या जैश ए मोहम्मदचा दहशतवादी रईस अहमद असादउल्ला शेख याला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या नागपूर युनिटनं ताब्यात घेतले आहे.
Nagpur RSS News : नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग (Nagpur RSS Reshim Baug) परिसरातील डॉ हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणाऱ्या जैश ए मोहम्मदचा दहशतवादी रईस अहमद असादउल्ला शेख याला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या नागपूर युनिटनं ताब्यात घेतले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांकडून रईस अहमद असादउल्ला शेखचा ताबा प्रोडक्शन वॉरंटवर घेण्यात आला आहे.
रईस अहमद असादउल्ला शेखने गेल्या वर्षी जुलै महिन्यात नागपुरात येऊन डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसर तसेच इतर काही महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याची माहिती होती. त्यानंतर त्याला जम्मू-काश्मीरमध्ये काश्मीर पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत रईस न पाकिस्तानमधील जैशच्या हँडलरच्या आदेशावरून नागपुरात रेकी केल्याचे समोर आल्यानंतर नागपूर पोलिसातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही काश्मीरमध्ये जाऊन त्याची चौकशी केली होती.
आता पुढील तपासासाठी एटीएसच्या नागपूर युनिटने रईसचा ताबा घेतला असून नागपुरात तो कोणाच्या सांगण्यावरून आला होता आणि त्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतीची कुठून आणि कशी रेकी केली. तसेच कोण कोणती माहिती त्यांनी पाकिस्तान मधील आपल्या हँडलर पुरवली याचा तपास सुरू केला आहे. रईसनं रेशीमबाग परिसरात जाऊन रेकी केली होती, तसेच त्यानं काही फोटो देखील काढले होते.
रेशीमबाग परिसराची रेकी करणाऱ्या या दहशतवाद्यानं पाकिस्तानला फोटो पाठवलं असल्याचं समोर आलं होतं. रईसनं स्थानिक कुणाचं सहकार्य नव्हतं हे तपासातून पुढं आलं असल्याचं देखील पोलिसांनी सांगितलं होतं. केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्याची तपास यंत्रणा या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.
नागपूरमध्ये रेकी करणाऱ्या रईस अहमदला काश्मीरमध्ये अटक करण्यात आलं होतं. तो विमानाने जुलै महिन्यात नागपुरात आला होता. नंतर त्याला जम्मू-काश्मीरमध्ये हॅण्डग्रेनेडसह अटक झाल्यानंतर प्रकरणाचा उलगडा झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिसराची रेकी, गुप्तचर संस्थेचा अहवाल
Nagpur RSS : रेशीमबाग परिसराची रेकी करणाऱ्या माणसाने पाकिस्तानला पाठवले फोटो ABP Majha