Jalgaon News : दारू पिऊन करायचा मारहाण, रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या पत्नीने कापला गळा
Jalgaon News Update : चारित्र्यावर संशय घेत दारूच्या नशेत मारहाण करणाऱ्या पतीच्या जाचाला कंटाळलेल्या पत्नीने विळ्याने वार करत पतीची हत्या केलीय. जळगाव जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.
Jalgaon News Update : जळगाव जिल्ह्यातील बोडवड तालुक्यातील पाच देववाडी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्यावर संशय घेत दारूच्या नशेत मारहाण करणाऱ्या पतीच्या जाचाला कंटाळलेल्या पत्नीने विळ्याने वार करत पतीची हत्या केलीय. दगडू सुरवाडे असे हत्या झालेल्या पतीचे नावा आहे. तर आशा सुरवाडे असे हत्या करणाऱ्या संशयित पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आशा सुरवाडे विरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. या घटनेने जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
दगडू सुरवाडे हा सतत दारू पिऊन नशेमध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातून तो तिला रोज अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असत. रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या आशा हिने पतीच्या डोक्यात विळ्याने वार करून त्याची हत्या केली. सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिस ठाण्यात आशा सुरवाडे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Jalgaon News Update : रोजच्या त्रासाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील करंजी पाचदेवडी या भागातील करंजी पाचदेवडी (ता. बोदवड ) येथे दगडू सुरवाडे याचा पत्नी आशा सुरवाडे, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. याच ठिकाणी दगडू सुरवाडे हे शेती आणि मजुरी करत होते. त्यांना दारू पिण्याची सवय होती. दररोज सायंकाळी दारू पिऊन पत्नी आशा सुरवाडे हिला तिच्या चारित्र्यावर संशय घेत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारझोड करत असल्याने पत्नी त्याच्या रोजच्या त्रासाला कंटाळली होती.
सोमवरी सांयकाळी नेहमी प्रमाणे कामावरून घरी येताना दगडू दारू पिऊन आले. त्यामुळे दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. पतीच्या रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या पत्नी आशाने दगडू सुरवाडे यांच्या डोक्यात विळ्याने वार केले. यात दगडू सुरवाडे यांचा जागीच मृत्यू झाला.
Jalgaon News Update : मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
या प्रकरणी दगडू यांची मुलगी रोशनी सुरवाडे ( वय 17 ) हिच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिस ठाण्यात आशा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी संशयित आशा हिला ताब्यात घेत अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आशिष कुमार अडसूळ यांच्या मार्गदर्शक मनोहर पाटील करीत आहेत, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या