एक्स्प्लोर

Recruitment Scam : आरोग्य विभागात नोकरभरतीचा महाघोटाळा, बोगस नियुक्तीपत्र देऊन नांदेडसह राज्यभरात अनेकांची फसवणूक

Recruitment Scam : आरोग्य विभागात नोकरभरतीचा महा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. नांदेडमधील तरूणाच्या फसवणुकीनंतर हा घोटाळा समोर आलाय.

Nanded News Update : नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा नोकर भरतीचा महाघोटाळा (Recruitment Scam) उघड झालाय. आरोग्य विभागात ( Health Department) बोगस नियुक्तीपत्र देऊन अनेकांची फसवणूक (Cheating) केल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागातील आरोग्य सेवक पदाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आल्यानंतर नांदेड (Nanded News Update ) जिल्ह्यातील किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. 

राज्यात खळबळ उडवून देणारा एमपीएससी ( MPSC ) घोटाळा पाच वर्षापूर्वी नांदेड येथूनच उघडकीस आला होता. आता त्यानंतर आरोग्य विभागाचा बनावट नोकर भरतीचा महा घोटाळा उघडकीस आला आहे. नांदेडमधील किनवट तालुक्यातील पदवीधर असलेल्या सचिन जाधव या 34 वर्षीय युवकाची फसवणूक झाली आहे. त्याच्या फसवणुकीनंतर राज्यभरातील हा घोटाळा उघड झालाय.  

सचिन जाधव याच्या वडिलांच्या परिचयातील आनंदराव सोनकांबळे यांनी अमरावती आरोग्य विभागात आरोग्य सेवक, लिपिक पदांच्या जागा असल्याचे सांगत माझ्या वशील्याने या जागांवर नोकरीला लावतो, परंतु, त्यासाठी सात लाख रुपये लागतील असे सांगितले. यावर विचार विनिमय करूण त्यांनी सोनकांबळे यांना होकार कळवत दोन टप्प्यांत पैसे दिले. त्यातील पहिला टप्पा 30 जुलै 2020 मधे दिला. तर दुसरा टप्पा 16 ऑगस्ट 22 रोजी दिला  गेला. पहिल्या हप्प्त्यानंतर  20 ऑगस्ट 2020 रोजी सचिन याला फोन करून आरोग्य सेवक पदाची ऑर्डर आल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले.

Recruitment Scam :  माहिती अधिकारातून घोटाळा उघड

बोगस नियुक्ती पत्र दिल्यानंतर दारव्हा ( जि. यवतमाळ ) येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रशिक्षणासाठी पाठवतो असे सचिन याला सांगण्यात आले. परंतु, या संदर्भात माहिती अधिकाराखाली माहिती मागवली असता अशी कोणतीही नोकर भरती प्रक्रिया  अमरावती आरोग्य विभागात  झाली नसल्याचे समोर आलं. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील सात ते आठ बेरोजगार युवक आणि महाराष्ट्रातील तब्बल 50 ते 60 बेरोजगारांना या घोटाळ्यात फसवले गेल्याची बाब समोर आली. 

Recruitment Scam :  पोलिसांकडून तपासाला गती

दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी किती तरूणांची फसवणूक झाली आहे? आणि यात आणखी कोणाचा हात आहे? याचा पोलिस तपासात  करत आहेत. गुन्ह्याची व्याप्ती पाहता या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget