एक्स्प्लोर

 Jalgaon News : जळगावधील अपघात प्रकरणी कार चालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, दोन्ही चालक अल्पवयीन

Jalgaon News Update : दोन कारमध्ये लागलेल्या रेसमध्ये सापडल्याने विक्रांत मिश्रा या अकरा वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल सायंकाळी जळगाव शहरातील मेहरून तलाव परिसरात घडली होती.

Jalgaon News Update : जळगवामध्ये कारच्या धडकेत अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्या प्रकरणी कार चालकांसह त्यांच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी दोन्ही कार चालकांविरोधात सदोष मनुष्यवधासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेले कारचालक अल्पवयीन आहेत. जळगाव शहरातील मेहरूण ट्रॅकवर दोन कारमध्ये लागलेल्या शर्यतीत कारने धडक दिल्याने विक्रांत संतोष मिश्रा या मुलाचा मृत्यू झाला होता. 

दोन कारमध्ये लागलेल्या रेसमध्ये सापडल्याने विक्रांत मिश्रा या अकरा वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल सायंकाळी जळगाव शहरातील मेहरून तलाव परिसरात घडली होती. या घटनेत पोलिसांनी कार चालक अल्पवयीन मुलांसह त्यांच्या पालकांविरोधात गुन्हा दाखाल केला आहे. या घटनेला जबाबदार असलेल्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मयत विक्रांत याच्या परिवाराने  केली  आहे.  

जळगाव शहरातील मेहरूण ट्रॅकवर दोन कारमधे रेस सुरू होती. यावेळी एका कारला ओव्हरटेक करून दुसरी कार भरधाव वेगाने पुढे जात असताना रस्त्याच्या बाजूने सायकलवर जात असलेला विक्रांत हा अकरा वर्षाचा मुलगा कारच्या समोर आल्याने इनोव्हा कारमधील चालक असलेल्या अल्पवयीन मुलाचे गाडीवरून नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेली कार सरळ विक्रांत याच्या सायकलला धडकली. ही धडक इतकी जोरात होती की विक्रांत हा त्याच्या सायकलीसह दहा फूट उंच फेकला गेला आणि जमिनीवर आदळला. यात तो गंभीर जखमी झाला. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या विक्रांतला नागरिकांनी अपघातग्रस्त इनोव्हामधून  रूग्णालयात दाखल केले. परंतु, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. 

मिश्रा परिवारातील एकुलता एक असलेला विक्रांत मयत झाल्यानंतर त्याच्या परिवाराचा आक्रोश सगळ्यांचं मन हेलावून टाकणारा होता. या घटनेत मुलांच्या हातात कार देणाऱ्यांवर खुनाचे गुन्हे दाखल करावे आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मयत विक्रतांचा परिवार करीत आहे. "आमचा मुलगा गेला, असा दुसरा कोणाचा जाऊ नये यासाठी अशा बेजबाबदार लोकांवर  कठोर कारवाई  होणे गरजेचे असल्याचं मिश्रा परिवाराचं मत आहे.  

दरम्यान, या प्रकरणी नागरिकांमधून देखील संताप व्यक्त होत आहे. "या परिसरात असलेल्या अवैध धंद्याच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, परिसरात गस्त वाढवावी, भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई व्हावी, परिसरात गतीरोधक बसविण्यात यावेत, लहान मुलांच्या हातात वाहने चालविण्यास देणाऱ्या पालकांवर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

पोलिसांनी कार चालकांविरोधात सदोष मनुष्यवधासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याबरोबरच गाडी मालक मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले असून दोन्ही कार चालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

महत्वाच्या बातम्या

Jalgaon News : शर्यतीने घेतला चिमुकल्याचा बळी, कारच्या धडकेत जळगावमध्ये मुलाचा मृत्यू 

महत्त्वाच्या बातम्या

Dhule Crime : धुळ्यात भयंकर घटना! साक्रीत पतीने पत्नी अन् तीन वर्षांच्या मुलाला दगडाने ठेचून मारले; स्वतःवरही केला जीवघेणा हल्ला
धुळ्यात भयंकर घटना! साक्रीत पतीने पत्नी अन् तीन वर्षांच्या मुलाला दगडाने ठेचून मारले; स्वतःवरही केला जीवघेणा हल्ला
पती गाढ झोपेत असतानाच पत्नीने केला घात, पतीला जागेवरच संपवलं, धक्कादायक घटनेनं कोल्हापूर हादरलं 
पती गाढ झोपेत असतानाच पत्नीने केला घात, पतीला जागेवरच संपवलं, धक्कादायक घटनेनं कोल्हापूर हादरलं 
Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात पोलिसांना अमेरिकेतील सूत्रधार अनिल पंडित पर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडला, प्रांजल ठाकरच्या अटकेनंतर कनेक्शन समोर
प्रांजल ठाकरची अटक पोलिसांसाठी ट्रम्प कार्ड ठरणार, टायगर श्रॉफ गोळीबाराचा मुख्य सूत्रधार अनिल पंडितचं कनेक्शन उघड
प्रेमविवाहाचा राग मनात; येवल्यात भर लग्नात नवरदेवाला डिझेल ओतून जाळण्याचा प्रयत्न, तुंबळ हाणामारीत 7 ते 8 जण जखमी
प्रेमविवाहाचा राग मनात; येवल्यात भर लग्नात नवरदेवाला डिझेल ओतून जाळण्याचा प्रयत्न, तुंबळ हाणामारीत 7 ते 8 जण जखमी

व्हिडीओ

NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report
Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PAK vs ENG :  दहाव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी, 154 वर 9 विकेट गेल्यानंतरही मैदान सोडलं नाही, पाकिस्तानच्या विजयाचा हिरो शादाब खाननं इतिहास भूगोल बदलून टाकला
154 वर 9 विकेट गेल्या, मॅच संपल्यात जमा, शादाब खाननं 10 व्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी करत क्रिकेटचा इतिहासच बदलला 
Aadhaar Email Update : आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला थेट RCB च्या कोचचा सपोर्ट  
हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला कुणाकडून पसंती?
Gold Price :  ऑगस्ट महिन्यातील उच्चांकावरुन चांदी 56000 रुपयांनी स्वस्त, सोने दरात 23000 रुपयांची घसरण, सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले?  
सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले? ऑगस्टमधील उच्चांकाच्या तुलनेत सोनं 23 हजारांनी स्वस्त
Loan : जगातील अनेक देश कर्जात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणत्या देशांवर किती कर्ज? सर्वाधिक कर्ज 'या' देशावर
जगातील बडे देश कर्जाच्या जाळ्यात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणावर किती कर्ज?
Gold Silver Rate : चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
Donald Trump: अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
Embed widget