एक्स्प्लोर

 Jalgaon News : शर्यतीने घेतला चिमुकल्याचा बळी, कारच्या धडकेत जळगावमध्ये मुलाचा मृत्यू

Jalgaon News Update : कारने दिलेला धडकेत सायकलस्वार चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी जळगावमध्ये घडली.

Jalgaon News Update : जळगाव शहरातील मेहरूण ट्रॅकवर दोन कारमध्ये लागलेली शर्यत एका चिमुकल्याच्या जीवावर बेतली आहे. कारने दिलेला धडकेत सायकलस्वार चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. विक्रांत संतोष मिश्रा (वय, 11 रा. एकनाथ नगर, मेहरून ट्रॅक जवळ ) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. हा अपघात एवढा जोरदार होता की या घटनेत कारच्या धडकेनंतर चिमुकला चेंडू सारखा हवेत उडाला. त्यातच त्याचा गाजीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धडक देणाऱ्या कारमधील तीन जणांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, विक्रांत मिश्रा हा वडील संतोष गिरीजाशंकर मिश्रा, आई रिचा यांच्यासोबत जळगावात राहत होता. विक्रांत हा मेहरूण जलतरण तलावसमोरील विद्या इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होता. आज रविवार असल्याने विक्रांतला शाळेत सुट्टी होती. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरापासून जवळ असलेल्या मेहरूण ट्रॅकवर त्याच्या काकाचा मुलगा सुनिल जितेंद्र मिश्रा याच्यासोबत गेला होता. यावेळी मेहरूण ट्रॅकवर दोन कारमध्ये रेस लागली होती. या रेसमधील एका कारने (  क्रमांक , एमएच 19 बीयू 6006) विक्रांतला जोरदार धडक दिली. या धडकेत विक्रांत  जागीच ठार झाला. कारच्या धडकेनंतर चिमुकला चालवत असलेली सायकल झाडावर अडकली होती. 

दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की कारने धडक दिल्यानंतर विक्रांत चेडूंसारखा 12 ते 15 फूटवर उडाला होता. त्याची सायकल झाडावर अडकली होती. घटना घडल्यानंतर जवळच्या नागरिकांनी धाव घेवून त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषीत केले. 

मिश्रा परिवारावर दु:खाचा डोंगर

या घटनेमुळे परिसरातील नागरिक सुन्न  झाले होते. जिल्हा रूग्णाालयात नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती. मयत मुलाच्या पश्चात आई रिचा आणि वडील संतोष गिरीजाप्रसाद मिश्रा असा परिवार आहे. संतोष मिश्रा हे जळगाव साऊंड असोसिएशन संघटनेचे सहसचिव म्हणून काम करतात तर त्यांचा डी.जे. रिपेअरींगचा व्यवसाय आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने मिश्रा परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अपघातातील कार आणि तीन जणांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Gulabrao Patil: 'भाजपवाले जसे आमचे लोक फोडतात, तसेच शिक्षकांनी इंग्रजी शाळांमधील पोरं फोडावी'; गुलाबराव पाटलांचा सल्ला, भाजपचाही पलटवार
'भाजपवाले जसे आमचे लोक फोडतात, तसेच शिक्षकांनी इंग्रजी शाळांमधील पोरं फोडावी'; गुलाबराव पाटलांचा सल्ला, भाजपचाही पलटवार
कुणाच्या ताटातलं घेऊ नये, हक्कावर गदा आली तर ओबीसीही शांत बसणार नाहीत, मराठा आरक्षणाबाबत नेमकं काय म्हणाले गुलबाराव पाटील? 
कुणाच्या ताटातलं घेऊ नये, हक्कावर गदा आली तर ओबीसीही शांत बसणार नाहीत, मराठा आरक्षणाबाबत नेमकं काय म्हणाले गुलबाराव पाटील? 
अमृत महोत्सवाला भाजप नेत्यांची दांडी, नाथाभाऊ म्हणाले मी दुःखी, म्हणाले, भाजप वाढवण्यासाठी किती मेहनत घेतली हे बाहेरुन आलेल्यांना काय माहित
अमृत महोत्सवाला भाजप नेत्यांची दांडी, नाथाभाऊ म्हणाले मी दुःखी, म्हणाले, भाजप वाढवण्यासाठी किती मेहनत घेतली हे बाहेरुन आलेल्यांना काय माहित
Jalgaon Accident: भीषण अपघात! भरधाव कारने तीन महिलांना अक्षरशः हेवेत उडवलं; एका महिलेचा जागीच मृत्यू,जळगावच्या चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरील घटना
भीषण अपघात! भरधाव कारने तीन महिलांना अक्षरशः हेवेत उडवलं; एका महिलेचा जागीच मृत्यू,जळगावच्या चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरील घटना

व्हिडीओ

Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: कसले डाॅल्बी लावताय, यात कसला आनंद आलाय? गणपती जाताना घरं मोकळं मोकळं वाटतं, वाईट वाटतं, त्यात डाॅल्बीचा कसला आनंद आणताय?? राज ठाकरेंनी डीजे समर्थकांना थेट फटकारलं
कसले डाॅल्बी लावताय, यात कसला आनंद आलाय? गणपती जाताना घरं मोकळं मोकळं वाटतं, वाईट वाटतं, त्यात डाॅल्बीचा कसला आनंद आणताय?? राज ठाकरेंनी डीजे समर्थकांना थेट फटकारलं
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
माझ्या सख्ख्या चुलत भावाचा गतवर्षी डीजेमुळे मृत्यू झाला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी गणेशोत्सवाबाबत मांडली परखड भूमिका
Pune Crime News: मध्यरात्री लॉक तोडून आत शिरले; मुख्य गेटचा कोयंडा तोडला, सेफ्टी दरवाजा तोडून आत गेले अन्...; 'चड्डी-बनियान गँग'ची शाळेत चोरी, 12 लाखांचा ऐवज लंपास
मध्यरात्री लॉक तोडून आत शिरले; मुख्य गेटचा कोयंडा तोडला, सेफ्टी दरवाजा तोडून आत गेले अन्...; 'चड्डी-बनियान गँग'ची शाळेत चोरी, 12 लाखांचा ऐवज लंपास
राज्यात आश्रमशाळात 2 वर्षांत 590 हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू, कुटुंबाच्या हातावर 2 लाख टेकवतात, काही राजकारणी पाळीव प्राण्यांवर तेवढा खर्च एका वर्षात करतात, अभिजित दिपकेंची खंत
राज्यात आश्रमशाळात 2 वर्षांत 590 हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू, कुटुंबाच्या हातावर 2 लाख टेकवतात, काही राजकारणी पाळीव प्राण्यांवर तेवढा खर्च एका वर्षात करतात, अभिजित दिपकेंची खंत
सरकारी कार्यालयातील PM मोदींच्या फोटोवरुन राज ठाकरेंचं परखड मत; आशिष शेलारांचा पलटवार, म्हणाले...
सरकारी कार्यालयातील PM मोदींच्या फोटोवरुन राज ठाकरेंचं परखड मत; आशिष शेलारांचा पलटवार, म्हणाले...
Raj Thackeray on Aniruddhacharya: रावणाला 1 लाख मुलं आणि दीड लाख नातू.... अरे रावण मध्ये जेवलाबिवला की नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने हशा पिकला, नेमकं काय म्हणाले?
रावणाला 1 लाख मुलं आणि दीड लाख नातू.... अरे रावण मध्ये जेवलाबिवला की नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने हशा पिकला, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray: मला भीती वाटतेय, गणपतीच्या दिवसात दंगली घडवल्या जातील; राज ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य
मला भीती वाटतेय, गणपतीच्या दिवसात दंगली घडवल्या जातील; राज ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य
Raj Thackeray: देवावरची श्रद्धा, धर्माबद्दलचा अभिमान समजू शकतो, पण झिंग नाही; कुरळ्या केसांचा बाबा, श्रीराम-हनुमंतापर्यंत राज ठाकरेंनी सगळंच काढलं, भोंदूगिरीवर प्रहार
देवावरची श्रद्धा, धर्माबद्दलचा अभिमान समजू शकतो, पण झिंग नाही; कुरळ्या केसांचा बाबा, श्रीराम-हनुमंतापर्यंत राज ठाकरेंनी सगळंच काढलं, भोंदूगिरीवर प्रहार
Embed widget