Beed Crime: गर्भवती पत्नीसह पतीची आत्महत्या, बीड येथील धक्कादायक घटना; पोलीस तपास सुरू
Beed Crime: अकरा महिन्यापूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्यानं आत्महत्या केल्यानं संपूर्ण परिसरात शोककळा पसरलीय.
Beed Crime: बीड येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. गर्भवती पत्नीसह पतीनं आत्महत्या केलीय. नेकनुर ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या वैतागवाडी परिसरात आज दुपारी ही घटना घडलीय. या दोघांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिलाय. अकरा महिन्यापूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्यानं आत्महत्या केल्यानं संपूर्ण परिसरात शोककळा पसरलीय. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केलीय.
वैतागवाडी येथील राजेश जगदाळे (वय 27) आणि दिपाली जगदाळे (वय 24) दोघेही वैतागवाडी येथील रहिवाशी आहेत. त्यांचं लग्न 11 महिन्यापूर्वी झालं होतं. त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. काही महिन्यात त्यांच्या घरात आणखी एका नवीन पाहुण्याचं आगमन होणार होतं. परंतु आज दुपारी वैतागवाडी येथे राहत्या घरात या दोघांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलीय.
राजेश व दिपाली दोघांचे आई वडील शेतात तुर काढण्यासाठी गेले होते. गावात एका ठिकाणी सोळाव्याचा कार्यक्रम होता. ते घरी परतले असताना घराचे दार आतून बंद होते. त्यांनी बाहेरून आवाज दिला. परंतु, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळं नातेवाईकांनी दार तोडून आत प्रवेश केला असता दिपाली जगदाळे याचा मृतदेह बेडवर पडलेला होता. तर, राजेश जगदाळे हा लोखंडी रॉडला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या दोघांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिलाय. या घटनेमुळं अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, शवविच्छेदनाचा आहवाल आल्यानंतरच सत्य समोर येईल.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- Ulhasnagar Robbery: 91 तोळे सोनं चोरून घरकाम करणाऱ्या महिलेचा पोबारा, महिनाभरानंतर क्राईम ब्रँचने ठोकल्या बेड्या
- लग्नाची स्वप्न दाखवून 26 महिलांना कोट्यवधींचा गंडा, पोलिसांकडून आरोपी गजाआड
- Mumbai: दिवसाढवळ्या व्यापाऱ्याकडून 35 लाख लुटले, दरोडेखोर फरार
- जिम ट्रेनर झाला साखळी चोर; पोलिसांनी ठोकल्या बेड्या