एक्स्प्लोर

Jalgaon News: डी-मार्टमध्ये खरेदी करताना धक्का लागला; दोन ग्राहकांमध्ये जोरदार हाणामारी, पोलिसांनाच यावं लागलं

D-Mart Jalgaon : डी-मार्ट मध्ये खरेदी करताना दोन ग्राहकांच्या मध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून जोरदार हाणामारी झाल्याची घटना जळगाव शहरात घडली.

Jalgaon News :  अनेकदा गर्दीत, मॉल, मार्टमध्ये फिरत असताना  धक्का लागतो. अनेकजण धक्का लागल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतात आणि विषय संपवतात.मात्र, डी-मार्टमध्ये खरेदी करताना धक्का लागल्याने दोन ग्राहकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीनंतर पोलिसांना पाचारण करावे लागले. जळगावमध्ये हा सगळा प्रकार घडला. 

डी-मार्ट मध्ये खरेदी करताना दोन ग्राहकांच्या मध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून जोरदार हाणामारी झाल्याची घटना जळगाव शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत पोलिसांनी हाणामारी करणाऱ्या दोन्ही परिवारास ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून दोघांची चौकशी केली जात आहे. 

डी-मार्टमध्ये हाणामारी झाल्याचं  कळताच बाहेर मोठा जमाव जमला असल्यानं पोलिसांनी तातडीने मोठा बंदोबस्त तैनात केला. अधिक तणाव निर्माण होण्याची शक्यता पाहता डी मार्ट प्रशासनाने दुकान बंद करणे पसंत केले. या विषयावर डी मार्ट व्यवस्थापक याना विचारले असता त्यांनी दोन ग्राहकांच्या मध्ये हाणामारी झाल्याचं मान्य केले मात्र या पेक्षा अधिक बोलणे टाळले आहे
 
हाणामारी घटनेनंतर विषय आता पोलीस ठाण्यापर्यंत गेल्याने दोन्ही बाजूंकडून समेट घडवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, एका क्षुल्लक घटनेने दोन्ही कुटुंबीयांची चांगलीच शोभा झाली. 

किरकोळ वाद विकोपाला! चक्क बेसबॉल स्टिकने डाकसेवकाला जबर मारहाण

रस्त्यावरील कार बाजूला घेण्याच्या किरकोळ वादातून एका डाकसेवकाला जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये उघडकीस आला आहे.  दोन अज्ञात हल्लेखोराने बेसबॉल स्टीकने प्रहार करून डाकसेवकाच्या डोक्याला गंभीर इजा केली आहे. ही भयावह घटना यवतमाळच्या (Yavatmal Crime) वीर सावरकर चौक परिसरात रविवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी डाकसेवकाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दोघाविरुद्ध अवधूतवाडी पोलिसांनी (Yavatmal Police) खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

राहुल रमेश कराळे (राहणार दुबे ले आऊट, जुना उमरसरा,यवतमाळ) असे जखमी डाकसेवकाची नाव आहे. तो गिलाणी नगर येथील उप. डाकघरात कार्यरत आहेत. घटनेच्या वेळी राहुल त्याच्या कारमधून (एमएच 29 बीव्ही 9739) दाते कॉलेज चौकाकडून आर्णी रोडकडे जात होता. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या दोघांनी वाहन आडवे लावून राहुल सोबत वाद घातला. त्यानंतर राहुल आणि अज्ञात दोघे राहुलला शिवीगाळ करत त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली.

दरम्यान, त्यातील एकाने कारमधील बेसबॉल स्टीकने राहुलच्या डोक्यावर प्रहार केला. ज्यामध्ये राहुल गंभीर जखमी झाला आहे. सध्या राहुलला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, त्याच्या डोक्याची कवटी फुटल्याचे सांगण्यात आले आहे. राहुलची प्रकृती सध्या गंभीर असून याप्रकरणी मंगळवारी 24 जानेवारीला रमेश कराळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
Shivsena : गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?

व्हिडीओ

Devendra Fadnavis : ठाकरेंच्या युतीची टिंगल उडवली, म्हणाले, मला वाटलं झेलेन्स्की अन् पुतीनच एकत्र आले
Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये 'भिसे' कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून ऑफर?
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
सक्षम हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आई अन् प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर ओतून घेतले पेट्रोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2025 | बुधवार
Shivsena : गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची फौज, कोणाकोणाची नावं?
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Nashik : नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
नगरपरिषद अधिनियमांत सुधारणा, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय
नगरपरिषद अधिनियमांत सुधारणा, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय
Embed widget