एक्स्प्लोर

चिपळूणातील एटीएम मशीन फोडणारी टोळी जेरबंद, रत्नागिरी पोलिसांनी आरोपींना गोव्यात पकडले

Crime News : या टोळीने काही दिवसांपूर्वी एटीएम मशीनची रेकी केली होती.त्यानंतर त्यांनी चिपळूणातील एटीएम निवडले.गॅस कटरच्या सहाय्याने हे एटीएम मशीन फोडण्यात आले.

Chiplun Latest Crime News : चिपळूण शहरातील भोगाळे परिसरातील युनियन बॅंकेचे एटीएम फोडून 14 लाख 60 हजार 500 रूपयांची चोरी करणाऱ्या टोळीला गोव्यात जाऊन पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडील 4 लाख 5 हजार 290 रूपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा गाडी जप्त करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 24 तासाच्या आत हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.

डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी सांगितले की, गुन्ह्याची माहिती मिळताच 12 तपास पथके तैनात करण्यात आली.त्यामध्ये अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई,उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे,डॉ.सचिन बारी, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक हेमंतकुमार शहा,चिपळूणचे रवींद्र शिंदे,प्रवीण स्वामी,सुजित गडदे,रत्नदीप सांळुखे,मनोज भोसले,तुषार पाचपुते,संदीप पाटील,अमोल गोरे उपनिरीक्षक शाम आरमाळकर या आणि पोलिस पथकाने मेहनत घेत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.या पथकाला रोख 25 हजार रूपयांचे इनाम ज़ाहिर करण्यात आल्याचे डॉ.गर्ग यांनी सांगितले.एटीएम मध्ये मास्क घातलेल्या दोन व्यक्ती दिसल्या त्या अनुषंगाने तसेच तांत्रिक बाजू वापरून आरोपींचा शोध घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी इरफान आयुब खान वय 39 रा. कलिना मुंबई, मूळ उत्तरप्रदेश,वासिफ साबिर अली वय 25 रा.संगमनगर एन्टॉप हिल मुंबई,मूळ उत्तर प्रदेश.शादाब मकसूद शेख़ वय 35 रा.कलिना मुंबई,मूळ उत्तर प्रदेश. या तिघांना गोव्यात अटक करण्यात आली.त्यांच्याकडील 4 लाख 5 हजार 290 रूपयांची रोकड जप्त केली.तसेच गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार आणि तिघांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.पुढील तपास सुरू असून आणखी काही आरोपी आणि उर्वरित रोकड़ हस्तगत करू असा विश्वास डॉ.गर्ग यांनी व्यक्त केला.

काही दिवसांपूर्वी रेकी 
या टोळीने काही दिवसांपूर्वी एटीएम मशीनची रेकी केली होती.त्यानंतर त्यांनी चिपळूणातील एटीएम निवडले.गॅस कटरच्या सहाय्याने हे एटीएम मशीन फोडण्यात आले.आरोपी शादाब शेख याने गॅसकटरने हे मशीन फोडले आहे तसेच चौकशीत आरोपींनी ९ ऑगस्ट रोजी पुण्यातील एटीएम मशीन फोडून सात लाख रूपये चोरल्याची कबुली दिली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी दिली.

आणखी वाचा :

Chardrapur Crime : आर्थिक विवंचनेतून दोन चिमुकल्यांना विष देत वडिलांनीही संपवलं आयुष्य
Nagpur School Principal Kidnapped : मैत्रिणीनेच केले होते मुख्याध्यापकाचे अपहरण, 30 लाखांसाठी तब्बल 16 तास ठेवले ओलीस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Manoj Jarange : मनोज जरांगे मराठवाड्याचा दौऱ्यावर, हिंगोलीतून शांतता रॅलीने दौऱ्याची सुरुवातTop News in 9 Seconds | 9 सेकंदात 9 बातम्या | 05 July 2024 | ABP MajhaRahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीलाPandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
Vasant More: मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Embed widget