एका चोरीच्या तपासात सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील तब्बल नऊ वेगवेगळ्या ठिकाणच्या चोऱ्या उघडकीस
सोलापूर जिल्ह्यातील सिताराम लक्ष्मण येडगे असे त्याचे नाव असून त्याच्याकडून दहा लाख बारा हजार रुपये किंमतीचे चोरीचे साहित्य पोलिसानी ताब्यात घेतले आहे.
सांगली : सांगली, सोलापूर जिल्ह्यात चो-या करणारा रेकॉर्डवरील आरोपीला विटा पोलिसांनी अटक केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सिताराम लक्ष्मण येडगे असे त्याचे नाव असून त्याच्याकडून दहा लाख बारा हजार रुपये किंमतीचे चोरीचे साहित्य पोलिसानी ताब्यात घेतले आहे. या संशयित आरोपीस अटक केले असून त्याच्याकडून 1 ट्रॅक्टर, 6 रोटर, 1 ब्लोअर यांसह 10 लाख 12 हजार 500 चा मुद्देमाल जप्त केला आहे.
खानापूर तालुक्यातील करंजे येथील शिवेच्या मळ्यातून घरासमोर लावलेला ट्रॅक्टर 4 ऑगस्ट 2021 रोजी चोरी झाल्याची फिर्याद मारूती विठोबा माने यांनी विटा पोलिसात दिली होती. त्याचा तपास करत असताना खब-याद्वारे माहिती मिळाली असता आरोपी येडगे याला विटा येथे ताब्यात घेण्यात आले. त्यास अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सांगली व सोलापूर जिल्ह्यात चो-या केल्याची कबुली दिली. आरोपी सिताराम येडगे याने फक्त करंजे येथील ट्रॅक्टरच नव्हे तर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध नऊ ठिकाणी चोऱ्या करून 3 लाख 34 हजार किमतीचा 1 ट्रॅक्टर, 4 लाख 58 हजार रुपयांचे शक्तीमान कंपनीचे 6 रोटावेटर, 55 हजार रूपयांचा 1 औषध फवारणीचा ब्लोअर, 99 हजाराचे टाईल्स फरशीचे 99 बॉक्स, 50 हजार रुपयांचे 1 टन वजनाचे लोखंडी अँगल आणि 4 हजार 500 रुपयांची सिमेंट पत्र्याची 8 पाने, 12 हजार रुपयांचे रंगाचे 8 डबे अशा एकूण 10 लाख 12 हजार 500 रुपये किमतीची शेती अवजारे आणि इतर साहित्याची चोरी करून बाजारात विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. संशयित आरोपी सिताराम येडगे याच्यावर खानापूर तालुक्यासह विटा शहर,आटपाडी, कवठेमंका ळ या पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे शिवाय सांगोला पोलीस ठाण्या मध्ये तब्बल पाच गुन्हे दाखल आहेत.
संबंधित बातम्या :