धक्कादायक! तरुणीच्या ऑनर किलींगचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या पोलिसावर हल्ला, 3 जणांवर गुन्हा दाखल
कुटुंबियांच्या मनाविरुद्ध लग्न केलेल्या तरुणीच्या ऑनर किलींगचा (Honour killing) प्रयत्न हाणून पाडणाऱ्या पोलिसांवर तरुणीच्या कुटुंबियांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना अकोला जिल्ह्यात घडली आहे.
Akola News: अकोला (Akola) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुटुंबियांच्या मनाविरुद्ध लग्न केलेल्या तरुणीच्या ऑनर किलींगचा (Honour killing) प्रयत्न हाणून पाडणाऱ्या पोलिसांवर तरुणीच्या कुटुंबियांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना पातूर (Patur) तालुक्यातल्या पेडका पिंपरडोळी गावालगत घडली आहे. उमेश सांगळे असं हल्ला झालेल्या पोलिसाचं नाव आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे.
तिघांवर गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबियांनी उमेश सांगळे या पोलीस शिपायावर हल्ला केला आहे. या हल्ल्याचा 'एक्सक्लूझिव्ह' व्हिडीओ 'एबीपी माझा'च्या हाती लागलाय. काल संध्याकाळी ही घटना घडली आहे. पोलीस उमेश सांगळेंच्या सतर्कतेमुळं या घटनेतील प्रेमविवाह केलेली तरुणी बचावली आहे. दरम्यान, या घटनेत मुलीची आई आणि दोन भाऊ अशा तिघांवर अकोला जिल्ह्यातील चान्नी पोलिसांत जीवे मारण्याचा प्रयत्न आणि शासकीय कामांत अडथळा निर्माण करण्याचा गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना चान्नी पोलिसांनी अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! नाशिकमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलावर प्राणघातक हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद