धक्कादायक! नाशिकमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलावर प्राणघातक हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
Nashik Crime News : गौळणे गावाचे सरपंच अजिंक्य चुंभळे यांच्यावर काही समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे.
Nashik Crime News नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीतील लेखानगर येथे गौळणे गावाचे सरपंच अजिंक्य चुंभळे (Ajinkya Chumbhale) यांच्यावर काही समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चुंभळे हे त्यांच्या संपर्क कार्यालयात गेल्याने हा अनर्थ टळला. घटना घडल्यानंतर चुंभळे समर्थकांनी परिसरात एकच गर्दी केली होती. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
याबाबत अंबड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अजिंक्य चुंभळे हे लेखानगर येथे त्यांच्या कार्यालयात असताना अज्ञात पाच-सहा समाजकंटकांनी एका अंडा भुर्जी विक्रेत्यास दमबाजी केली. यावेळी चुंभळे यांनी भुर्जी विक्रेते व या परिसरात नेहमीच गुंडागर्दी करणाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
धारदार चॉपर घेऊन हल्ल्याचा प्रयत्न
वाद मिटत नसल्याने पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिल्याचा राग आल्याने काही वेळाने हे गावगुंड हातात धारदार चॉपर घेऊन आले. यावेळी बेसावध असलेल्या चुंभळे यांच्यावर प्राणघातक हत्यारांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चुंभळे हे त्यांच्या संपर्क कार्यालयात गेल्याचे बघताच हल्लेखोरांनी येथून पळ काढला. ही बाब वाऱ्यासारखी पसरल्यानंतर चुंभळे समर्थकांनी लेखानगर येथील संपर्क कार्यालयावर एकच गर्दी केली. अंबड पोलिसांना ही बाब समजल्यानंतर त्यांनीही घटनास्थळ गाठले. तर अजिंक्य चुंभळे यांना समजावून सांगत संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत याबाबत अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हत्यार माझ्याकडे द्या, मी हल्ला करतो
हल्ला करण्यासाठी आलेल्या समाजकंटकांपैकी एकाने मी अल्पवयीन आहे. हत्यार माझ्याकडे द्या, मी हल्ला करतो. माझ्यावर कोणतीही पोलीस कारवाई होऊ शकत होणार नाही, असे वक्तव्य केल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तर गावागुंडांचे वाढते प्रकार लक्षात घेता वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी सिडकोवासीयांमधून जोर धरू लागली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
धक्कादायक! पुण्यात RTO अधिकाऱ्यानेच दोघांना उडवले; उपचाराचा खर्च देतो म्हणत आता हात झटकले