(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Zomato : झोमॅटोची मोठी घोषणा ; आता 10 मिनिटांमध्ये होणार फूड डिलेव्हरी
झोमॅटो(Zomato) च्या या नव्या फिचरला झोमॅटो इंन्स्टंट (Zomato Instant) असं नाव देण्यात आलं आहे.
Zomato : अनेक लोक ऑनलाइन पद्धतीनं फूड ऑर्डर करतात. झोमॅटो(Zomato) या अॅपचा वापर करून लोक वेगवगेळ्या डिश ऑनलाइन पद्धतीनं ऑर्डर करतात. गेल्या वर्षी ग्रोसरी डिलीव्हरी सुविधा सुरू केल्यानंतर आता झोमॅटो लवकरच दहा मिनीटांमध्ये फूड डिलेव्हरी देणार आहे. या नव्या फिचरला झोमॅटो इंन्स्टंट (Zomato Instant) असं नाव देण्यात आलं आहे. कंपनीचे संस्थापक दीपेंद्र गोयल (Deepinder Goyal) यांनी या नव्या फिचरबद्दल माहिती दिली आहे.
झोमॅटोचे सह संस्थापक दीपिंदर गोयलनं सोमवारी (21 मार्च) रोजी ट्विटरवर एका नव्या फिचरची घोषणा केली. हे फिचर पुढच्या महिन्यात गुरूग्राममध्ये लाँच करण्यात येणार आहे. नव्या फीचरमध्ये डिलिव्हरी एजंटच्या सुरक्षेची देखील काळजी घेतली जाणार आहे, असे दीपंदर गोयल यांनी सांगितलं.
असं असेल नवं फिचर
नव्या फिचरबद्दल दीपिंदर गोयल यांनी सांगितलं की दहा मिनीटांमध्ये डिलीव्हरी करणाऱ्या या सिस्टीम काऊंटरच्या नेटवर्कचे काम सुरू आहे. हे काऊंटर जिथे जास्त प्रमाणात फूड ऑर्डर केले जाते, अशा परिसरात असेल, ज्यामुळे ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना गरम आणि ताजे अन्न मिळेल.
Announcement: 10 minute food delivery is coming soon on Zomato.
— Deepinder Goyal (@deepigoyal) March 21, 2022
Food quality – 10/10
Delivery partner safety – 10/10
Delivery time – 10 minutes
Here’s how Zomato Instant will achieve the impossible while ensuring delivery partner safety – https://t.co/oKs3UylPHh pic.twitter.com/JYCNFgMRQz
नव्या फिचरबाबत दीपिंदर यांनी सांगितले की, अनेक वेळा आम्ही असं पाहिलं आहे की कस्टमर ऑर्डर देत असताना सर्वात लवकर कुठल्या हॉटेलमधून फूर डिलेव्हरी मिळेल, या गोष्टचा विचार करतात. त्यामुळे आम्ही हे फिचर सुरू करण्याचा निर्णय घेतला.
संबंधित बातम्या
- Trending : तरुणीच्या गालावर 'ती' खळी नाहीच! भन्नाट आयडीया, सोशल मिडियावर ट्रोल
- आतापर्यंत तुम्ही गुलाबजाम खाल्ले आहेत, पण गुलाबजाम पराठा तुम्हाला माहित आहे का? पाहा हा व्हिडीओ
- Zomato Swiggy App Down: झोमॅटो, स्विगीचे अॅप डाऊन, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha