Trending : तरुणीच्या गालावर 'ती' खळी नाहीच! भन्नाट आयडीया, सोशल मिडियावर ट्रोल
Trending News : या व्हिडिओ मध्ये तरुणीने कल्पकतेचा वापर करत 'डिंपल टेकनीक' चा व्हिडिओ शेअर केला आहे,
Trending News : सोशल मिडियावर (Social Media) एखादी पोस्ट टाकल्यावर काही क्षणातच व्हायरल होते. अशातच काही इंटरेस्टींग पोस्ट किंवा व्हिडिओ असेल तर त्यावर नेटकऱ्यांकडून त्यावर लाईक्स किंवा ट्रोल व्हायला क्षणाचाही विलंब लागत नाही. असाच एक व्हिडिओ एका तरुणाने सोशल मिडियावर पोस्ट केला आहे, त्यावर काहींनी लाईक्सचा वर्षाव केलाय तर काहींनी तिला ट्रोल केलंय. या व्हिडिओ मध्ये तरुणीने कल्पकतेचा वापर करत 'डिंपल टेकनीक' चा व्हिडिओ शेअर केला आहे,
तरुणीच्या गालावर 'ती' खळी नाहीच! तिची भन्नाट आयडीया, सोशल मिडियावर ट्रोल
सोशल मीडियावर व्यक्तीच्या प्रतिभेचे कौतुक करण्यात येते. अनेक लोकं व्यक्तीच्या प्रतिभेसोबत सौंदर्याचंही तितकंच कौतुक करतात. व्यक्तीच्या गालांवरील डिंपल्सला ब्युटी स्पॉट्स म्हणतात. असे मानले जाते की, गालावर खळी असलेल्या लोकांकडे लोक जास्त आकर्षित होतात. शाहरुख खानपासून ते प्रीती झिंटापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक मोठे स्टार्स आहेत जे त्यांच्या खळीसाठी ओळखले जातात. अशातच एका मुलीची डिंपल टेकनिक इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक मुलगी मार्कर घेते आणि आधी तिच्या गालावर एका जागी खुण करते आणि नंतर ती पुसता. त्यानंतर ते चिन्ह नाहीसे होते आणि खरी वाटेल अशी खळी दिसते. तुम्हीही हा व्हिडिओ पाहा.
View this post on Instagram
19 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला व्हिडिओ
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. काही लोक म्हणत आहेत की, या मुलीला आधीच डिंपल आहे आणि तिला बनावट म्हणत आहेत. तर, काही लोकं मुलीच्या भन्नाट कल्पनेचे कौतुक करत आहेत. या दोन गटांतील वाद होताना दिसत आहे. हा व्हिडिओ 19 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याच वेळी, 1 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइक देखील केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine War: युक्रेनला हवा असलेला 'नो फ्लाय झोन' म्हणजे काय, 'नाटो'कडून का दिला जातोय नकार?
- Russia Ukraine War : युक्रेनच्या राष्ट्रपतींच्या घराजवळ रॉकेट हल्ला, झेलेन्स्की म्हणाले...