एक्स्प्लोर

उर्जानिर्मिती करणाऱ्या 'या' कंपनीचा शेअर तुम्हाला करू शकतो मालामाल; 'हे' आहे कारण!

उर्जानिर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांत या कंपनीचे नाव घेतले जाते. आगामी काळात ही कंपनी चांगला परतावा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई : सध्या उन्हाळा चालू आहे. या काळात विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. याचा परिणाम वीजनिर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांच्या समभागांवर पडण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता उर्जानिर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या जेएसडब्ल्यू निओ एनर्जी लिमिटेड (JSW Neo Energy) या कंपनीला सरकारच्या एनटीपीसी या कंपनीने वीजनिर्मिती प्रकल्प उभा करण्याची मोठी ऑर्डर दिली आहे. जेएसडब्ल्यू निओ एनर्जी लिमिटेड ही जेएसडब्ल्यू एनर्जी या दिग्गज कंपनीची उपकंपनी आहे. त्यामुळे आगामी काळात या कंपनीच्या शेअरचे मूल्य वाढण्याची शक्यता आहे. 

आगामी काळात शेअर प्राईज वाढण्याची शक्यता?

मिळालेल्या माहितीनुसार नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन म्हणजेच एनटीपीसी या कंपनीने जेएसडब्ल्यू निओ एनर्जी या कंपनीला  700 MW उर्जानिर्मिती करणाऱ्या सोलार पॉवर प्रोजेक्टची निर्मिती करण्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरमुळे आगामी काळात या कंपनीच्या शेअरचे मूल्य वाढू शकते. सध्या भांडवली बाजारात या शेअरचे मूल्य 625 रुपये (JSW Energy Share Price) आहे. गेल्या एका महिन्यात या कंपनीच्या समभागांत 30 टक्क्यांची तेजी आलेली आहे. JSW Energy कंपनीची उर्जानिर्मितीची क्षमता 13.3 GW पर्यंत पोहोचली

मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसईच्या संकेतस्थळार उपलब्ध असलेल्या माहितीनुसार एनटीपीसीच्या या नव्या ऑर्डरमुळे जेएसडब्लूय एनर्जी कंपनीच्या उर्जीनिर्मिती क्षमतेत वाढ होणार आहे. या ऑर्डरमुळे JSW Energy कंपनीची लॉक्ड-इन जनरेशन कॅपेसिटी ही 13.3 GW वर पोहोचली आहे. सध्या या कंपनीची इन्स्टॉल्ड उर्जानिर्मितीची क्षमता 7.2 GW आहे. 2024 वर्षाच्या शेवटपर्यंत ही क्षमता 9.8 GW पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या कंपनीच्या 2.6 GW उर्जानिर्मिती क्षमतेच्या प्रकल्पाचे काम चालू आहे.  

जेएसडब्ल्यू कंपनीच्या शेअरचे मूल्य काय आहे? (JSW Energy Share Price History)

JSW Energy या कंपनीच्या शेअरचे सध्याचे मूल्य 625 आहे.19 एप्रिल म्हणजेच शुक्रवारी या कंपनीचा शेअर 638 रुपयांपर्यंत गेला होता. या आठवड्यात या शेअरमध्ये दोन टक्के, दोन आठवड्यांत 4.5 टक्के, एक महिन्यात 30 टक्के, तीन महिन्यांत 25 टक्के, सहा महिन्यांत 55 टक्के तर एका वर्षांत 150 टक्क्यांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.  

जेएसडब्ल्यू एनर्जी ही कंपनी नेमकं काय करते? 

जेएसडब्ल्यू एनर्जी ही कंपनी प्रामुख्याने वीजनिर्मिती क्षेत्रात काम करते. 2030 सालापर्यंत 20 GW उर्जानिर्मिती करण्याचे तसेच 40 GWh उर्जेला साठवण्याची क्षमता निर्माण करण्याचे या कंपनीचे लक्ष आहे. या कंपनीने 2050 कार्बन न्यूट्रलिटीचे ध्येय्य गाठण्याचा निश्चय व्यक्त केलेला आहे. ही कंपनी खासगी क्षेत्रातील वीजनिर्मिती करणारी आघाडीच्या कंपन्यांतील एक कंपनी आहे. 

(टीप- फक्त माहिती देणे, हाच या लेखामागचा उद्देश आहे. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची सल्ला देत नाही. गुंतवणूक करायची असल्यास या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

हेही वाचा :

सरकारी योजना, फसवणुकीचा धोका नाही, 'या' योजनेत गुंतवल्यास तुम्हाला मिळणार भरघोस परतावा!

...तर तुम्हीही झाले असते करोडपती, चार वर्षांत 'या' कंपनीनं अनेकांना केलं मालामाल!

मंदिरात गेला अन् दान केले तब्बल 5 कोटी, मुकेश अंबानींच्या मुलाच्या दानशूरतेची चर्चा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyach Bola : सांगलीच्या इस्लामपूरमधली लढत कशी असेल ? :मुद्द्याचं बोला : ABP MajhaABP Majha Headlines :  7 PM :  2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सArvind Sawant : कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतोTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 7 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget