चार नवे आयपीओ येणार, मालामाल होण्याची नामी संधी; पैसे गुंतवण्याआधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या!
या आठवड्यात एकूण चार आयपीओ येणार आहेत. या आठवड्यात योग्य आयपीओत पैसे गुंतवून चांगले पैसे कमवण्याची नामी संधी चालू आली आहे.
मुंबई : या आठवड्यात पैसे कमवण्याची चांगली संधी चालून आली आहे. कारण या आठवड्यात एकूण चार आयपीओ (Upcoming IPO) येणार आहेत. या कंपन्यांच्या आयपीओमध्ये गुंतवमूक करून चांगला परतावा मिळवता येऊ शकतो. गेल्या आठवड्यातही नव्याने आलेल्या आयपीओंच्या माध्यमातून गुंतवणूकदारांनी चांगली कमाई केली. काही आयपीओंमुळे लोकांना तोटादेखील झाला. दरम्यान, या आठवड्यात एकूण चार आयपीओ येणार आहेत. त्यामुळे योग्य अभ्यास करून या आयपीओंमध्ये (IPO Investing) गुंतवणूक केल्यास, चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.
JNK India चा येणार आयपीओ
या चार आयपीओंमधील एक आयपीओ हा मेनबोर्ड श्रेणीतील आहे. तर उर्वरित तीन आयपीओ हे लघू आणि मध्यम श्रेणीतील म्हणजेच एसएमई श्रेणीतील आहेत. मेनबोर्ड सेगमेंटमध्ये JNK India या कंपनीचा आयोपीओ येणार असून तो गुंतवणुकीसाठी 23 एप्रिल रोजी खुला होणार आहे. लोकांना समभाग खरेदीसाठी या कंपनीने समभागांचा किंमत पट्टा (प्राईस बँड) 395 ते 415 रुपये निश्चित केला आहे. येत्या 25 एप्रिलपर्यंत हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे. आयपीओच्या माध्यमातून ही कंपनी 649 कोटी रुपयांचे भांडवल उभारू पाहात आहे. या कंपनीच्या शेअरची लॉट साईझ 36 शेअर्स आहे. ही कंपनी 30 एप्रिलपर्यंत बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होण्याची अपेक्षा आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी ग्रीन हायड्रोजनचे प्लान्ट तयार करते. ग्रीन हाइड्रोजनचा वापर वीजनिर्मिती और इलेक्ट्रिक कार तसेच अन्य कामांसाठी केला जातो.
अन्य तीन आयपीओ कधी येणार?
Varyaa Creations या कंपनीचा आयपीओ 22 एप्रिल रोजी येणार आहे. 25 एप्रिलपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करण्यात येणार आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 150 रुपये प्रति शेअर असून लॉट साईझ 1000 शेअर्स आहे. 30 एप्रिल रोजी ही कंपनी बीएसईवर येणार आहे. शिवम केमिकल्स या आणखी एका कंपनीचा आयपीओ 23 एप्रिल रोजी येणार आहे. 25 एप्रिलपर्यंत तुम्हाला या कंपनीत पैसे गुंतवता येणार आहेत. या आयपीओचा किंमत पट्टा 44 रुपये प्रति शेअर असून लॉट साईझ 3000 शेअर्स आहे. ही कंपनी भांडवली बाजारावर 30 एप्रिल रोजी येणार आहे. 23 एप्रिल रोजीच Emmforce Autotech या कंपनीचा आयपीओ येणार आहे. 25 एप्रिलपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे. या आयपीओचा प्राईझ बँड 93-98 रुपये प्रति शेअर असून लॉट साईझ 1200 शेअर आहे. 30 एप्रिल रोजी ही कंपनी भांडवली बाजारावर सूचिबद्ध होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
उर्जानिर्मिती करणाऱ्या 'या' कंपनीचा शेअर तुम्हाला करू शकतो मालामाल; 'हे' आहे कारण!
सरकारी योजना, फसवणुकीचा धोका नाही, 'या' योजनेत गुंतवल्यास तुम्हाला मिळणार भरघोस परतावा!
...तर तुम्हीही झाले असते करोडपती, चार वर्षांत 'या' कंपनीनं अनेकांना केलं मालामाल!