फक्त 'या' एका सरकारी योजनेत गुंतवा पैसे, तुमची मुलगी होणार लखपती; पैसे बुडण्याचाही नाही धोका!
सरकारच्या या योजनेत तुम्ही गुंतवणूक केल्यास तुमच्या मुलीसंदर्भात भविष्यातील आर्थिक चिंता दूर होईल. या योजनेत पैसे बुडण्याचा धोका नाही.
![फक्त 'या' एका सरकारी योजनेत गुंतवा पैसे, तुमची मुलगी होणार लखपती; पैसे बुडण्याचाही नाही धोका! what is sukanya samriddhi yojana scheme know detail information in marathi फक्त 'या' एका सरकारी योजनेत गुंतवा पैसे, तुमची मुलगी होणार लखपती; पैसे बुडण्याचाही नाही धोका!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/d10658d1256a28425f3ac575cc5359bc1719887018012988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sukanya Samriddhi Yojana: मुलगी जन्माला आली की घरात एक चैतन्य येतं. लहान मुलीचे बोबडे बोल, तिचं खेळणं यामुळे घरात कायम आनंद असतो. पण मुलगी मोठी झाल्यानंतर लग्नाला लाखो रुपये खर्च येऊ शकतो. त्यामुळे मुलीच्या लग्नासाठी ऐनवेळी कर्ज काढावे लागू नये यासाठी मुलीचा जन्म झाल्यापासूनच पैशांची गुंतवणूक करायला हवी. हे पैसे जमवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. हे पैसे जमा करण्यासाठी सरकारच्या आकर्षक योजना आहेत. यातील एका योजनेचे नाव म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. या योजनेत तुम्ही गुंतवणूक केल्यास तुमच्या मुलीच्या शिक्षणाची, लग्नाची चिंता दूर होईल. याच पार्श्वभूमीवर ही योजना नेमकी काय आहे? या योजनेतील गुंतवणुकीतून किती परतावा मिळतो? हे जाणून घेऊ या...
मुलगी 21 वर्षांची चांगला परतावा मिळणार?
सुकन्या समृद्धी योजना ही एक लघू बचत योजना आहे. या योजनेचे अनेक फायदे आहेत. यातीलच एक प्रमुख फायदा म्हणजे या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला करबचत करता येते. यासह तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतात. तुम्ही या योजनेत प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपये गुंतवल्यास तुमची मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. विशेष म्हणजे ही एक सरकारी योजना असल्यामुळे तुमचे पैसे बुडण्याचाही यात धोका नाही.
गुंतवलेल्या पैशांवर किती व्याज मिळणार?
सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही एकदा पैसे गुंतवायला सुरुवात केल्यास तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर 8.2 टक्के व्याज दिलं जातं. या योजनेअंतर्गत सुकन्या समृद्धी योजनेत खातेधारकाला वर्षाला 250 रुपयांपासून 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेत तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. मुलगी 15 वर्षांची होईपर्यंत तुम्हाला या योजनेत पैसे गुंतवावे लागतात. त्यानंतर मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही गुंतवलेले पैसे तसेच पैशांवरील व्याज अशी एकत्रित रक्कम मिळते.
दरवर्षी एक लाख रुपये गुंतवल्यास किती रुपये मिळणार?
सुकन्या समृद्धी योजनेत तुमच्या मुलीच्या नावावर तुम्ही वर्षाला एक लाख रुपये जमा केले असे गृहित धरले तर मुलीचे वय 15 वर्षे होईपर्यंत तुमच्या मुलीच्या नावावर 15 लाख रुपये जमा होतील. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीचे वय 21 वर्षे होईपर्यंत या पैशांचे एकूण मूल्य 46,18,385 एवढे होईल. म्हणजेच तुम्ही गुंतवलेल्या 15 लाख रुपयांवर 31,18, 385 रुपये व्याज मिळेल.
योजनेतील अन्य तरतुदी काय?
या योजने पैसे गुंतवल्यास तुम्हाला प्राप्तिकर कायद्यातील 80सी अधिनियमाअंतर्गत 1.50 लाख रुपयांची सुट मिळते. तसेच तुमच्या खात्याची मॅच्यूरिटी झाल्यानंतर मिळालेल्या एकूण रकमेवर कोणतेही व्याज आकारले जात नाही. केंद्र सरकारने 2015 साली ही योजना चालू केली होती. आपत्कालीन स्थितीत तुम्ही या योजनेतून पैसे काढू शकता. मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी तुम्ही गुंतवलेल्या पैशांतून 50 टक्के रक्कम काढू शकता.
हेही वाचा :
उशिरा ITR भरला तरी दंड लागणार नाही, 'या' लोकांना मिळते विशेष सूट!
नोकरदार वर्गासाठी महत्त्वाच्या टीप्स, 'अशा' पद्धतीने मिळवा करसवलत; वाचतील हजारो रुपये !
लवकरच येणार 'हे' दोन तगडे आयपीओ! गुंतवणुकीसाठी राहा तयार; पैशांचा पडू शकतो पाऊस?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)