लवकरच येणार 'हे' दोन तगडे आयपीओ! गुंतवणुकीसाठी राहा तयार; पैशांचा पडू शकतो पाऊस?
सेबीने दोन दिग्गज कंपन्यांच्या आयपीओ ड्राफ्टला मंजुरी दिली आहे. लवकरच आता या कंपनीचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत.
मुंबई : सध्या भारतीय शेअर बाजारात (Share Market) मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्याच्या सकारात्मक स्थितीमुळे गुंतवणूकदार चांगले पैसे कमवत आहेत. आयपीओच्या माध्यमातूनही गुंतवणूकदार चांगली कमाई करत आहेत. दरम्यान, लवकरच दोन नवे आयपीओ येणार आहेत. बाजार नियामक सेबीने (SEBI) या दोन्ही बहुप्रतीक्षित कंपन्यांच्या आयपीओंना मंजुरी दिली आहे. फस्टक्राय (Firstcry IPO) आणि युनिकॉर्मस (Unicommerce IPO) अशी या दोन कंपन्यांची नावे आहेत.
फस्टक्राय कंपनी नेमकं काय करते?
फस्टक्राय (Firstcry) चाईल्ड केअर क्षेत्रात काम करणारा मोठा ब्रँड आहे. या कंपनीचे ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोअर्स आहेत. छोट्या मुलांची कपडे, खेळणी तसेच अन्य साहित्याची विक्री या कंपनीकडून केली जाते. देशाच्या वेगवेगळ्या भागात या कंपनीचे स्टोअर्स आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणूकदार या आयपीओची वाट पाहात होते. 30 एप्रिल रोजी या कंपनीने आपला ड्राफ्ट पुन्हा एकदा सेबीकडे पाठवला होता.
दोन्ही आयपीओ किती कोटी रुपये उभारणार
ब्रेनबीज सोल्यूशन्स फस्टक्राय ब्रँड नावाची ही कंपनी पुमअयात किरकोळ व्यापारात सक्रिय आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयपीओच्या मदतीने ही कंपनी 1,815 कोटी रुपये उभे करू पाहतेय. फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल अशा दोन्ही पद्धतीने गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येईल. तर युनिकॉमर्स ही कंपनी आयपीओच्या मदतीने 480 ते 490 कोटी रुपये उभे करणार आहे. सेबीने मंजुरी दिलेल्या या दोन्ही आयपीओंची एकत्रित किंमत 2,300 कोटी रुपये आहे.
यूनिकॉमर्समध्ये दिग्गजांची गुंतवणूक
फस्टक्राय या कंपनीत प्रेमजित इन्व्हेस्ट या कंपनीने गुंतवणूक केलेली आहे. तर युनिकॉमर्स या कंपनीत जपानच्या सॉफ्टबँक या कंपनीने गुंतवणूक केली आहे. या कंपनीकडे युनिकॉमर्सचे साधारण 30 टक्के शेअर्स आहेत. सेबीकडे दाखल केलेल्या ड्राफ्टनुसार युनिकॉमर्स या कंपनीचे प्रमोटर्स हे स्नॅपडीलचे सहसंस्थापक कुणाल बहल आणि रोहित बंसल हे आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
जुलै महिन्यात 'या' चार तारखा महत्त्वाच्या, आर्थिक व्यवहाराशी संबंधित अनेक नियम बदलणार!
नोकरदार वर्गासाठी महत्त्वाच्या टीप्स, 'अशा' पद्धतीने मिळवा करसवलत; वाचतील हजारो रुपये !
उशिरा ITR भरला तरी दंड लागणार नाही, 'या' लोकांना मिळते विशेष सूट!