एक्स्प्लोर
उशिरा ITR भरला तरी दंड लागणार नाही, 'या' लोकांना मिळते विशेष सूट!
ITR Filing : सध्या आयटीआर भरण्यासाठी नोकरदारांची लगबग चालू आहे. 31 जुलै 2024 पर्यंत लोकांना आयटीआर भरता येणार आहे.
itr filing (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/6

असे काही करदाते असतात ज्यांनी डेडलाईन संपल्यानंतर कर भरला तरी त्यांना कोणताही दंड भरावा लागत नाही.
2/6

ITR Filing: आर्थिक वर्ष 2023-24 आणि असेसमेंट वर्ष 2024-25 साठी आयटीआर फाईल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2024 आहे. या मुदतीच्या आत आयटीआर फाईल करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास दंड भरावा लगातो.
3/6

मात्र असे काही करदादा असतात ज्यांना मुदत संपल्यानंतर आयटीआर भरल्यास दंड द्यावा लागत नाही. हे करदाते कोण आहेत, हे जाणून घेऊ या...
4/6

एखादी व्यक्ती करपात्र नाही, तर त्या व्यक्तीने डेडलाईन संपल्यानंतर आयटीआर भरला तरी त्याला दंड लागत नाही. जुन्या करप्रणालीनुसार 2.50 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर आयटीआर भरताना कोणताही दंड भरावा लागत नाही. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तीसाठी ही मर्यादा तीन लाखांची आहे.
5/6

80 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला वार्षिक उत्पन्नाची ही मर्यादा पाच लाख रुपये आहे.
6/6

नव्या करप्रणालीनुसार 3 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर करात सवलत मिळते.
Published at : 01 Jul 2024 03:43 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























