Vedanta Group : वेदांता कंपनीची सौदी अरेबियात खनिज क्षेत्रात गुंतवणुकीची योजना
वेदांता समूहाने सौदी अरेबियातील भागधारकांशी चर्चा सुरु केली असून, पश्चिम आशियातील प्रमुख खनिज केंद्र बनण्याचे उद्दिष्ट आहे.
Vedanta Group : वेदांता लिमिटेड कंपनी लवकरच सौदी अरेबियामध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. खाण क्षेत्रातील प्रमुख असलेली ही वेदांता समूहाचे मालक उद्योगपती अनिल अग्रवाल यांनी सौदी अरेबियात खनिज क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी शोधत असल्याचं सांगितलं. कंपनीने आधीच सौदी अरेबियातील भागधारकांशी चर्चा सुरु केली असून, पश्चिम आशियातील खनिज केंद्र बनण्याचे उद्दिष्ट समोर ठेवल्याचं वेदांताने एका निवेदनात म्हटले आहे.
"वेदांताने सौदी अरेबियातील खनिज क्षेत्रात गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. कंपनी सौदी अरेबियामध्ये गुंतवणुकीच्या संधी शोधत असून, कंपनीला पश्चिम आशियातील प्रमुख खनिज केंद्रात बदलण्याचे उद्दिष्ट आहे," असे या निवेदनात म्हटले आहे.
याच निवेदनानुसार, वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी बुधवारी रियाधमध्ये आयोजित 'फ्यूचर मिनरल्स फोरम 2022' मध्ये प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी सौदी अरेबियाकडे सोने आणि चांदीसह खनिजांमध्ये असलेल्या प्रचंड संभाव्यतेवर बोलले.
भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील मजबूत सहकार्यामुळे मोठ्या संधी समोर येत आहेत. आम्ही खनिज क्षेत्रात गुंतवणुकीचे पर्याय ओळखण्याच्या प्रक्रियेत आहोत, ज्याचा आम्हाला विश्वास आहे की देशाकडे भरपूर प्रमाणात आहे. स्वच्छ आणि अधिक शाश्वत जगाच्या संक्रमणामध्ये खाण आणि खनिजे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील आणि आम्ही वेदांता कंपनी म्हणून या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी वचनबद्ध असल्याचं अग्रवाल मंचावर म्हणाले.
जागतिक स्तरावर झिंकची तीव्र मागणी आणि त्याची अपेक्षित कमतरता लक्षात घेऊन, सौदी अरेबिया धातूचा आघाडीचा उत्पादक बनण्यासाठी जागतिक कंपन्यांशी हातमिळवणी करण्याचा विचार करत आहे. वेदांत समूहाची कंपनी हिंदुस्तान झिंक ही जगातील सर्वात मोठ्या झिंक उत्पादकांपैकी एक आहे.
सौदी अरेबिया देशात ऊर्जा, शुद्धीकरण, पेट्रोकेमिकल्स, पायाभूत सुविधा, कृषी, खनिजे आणि खाणकाम या क्षेत्रात USD 100 अब्ज गुंतवण्याची योजना आखत आहे. भारताच्या 17 टक्के कच्च्या तेलाचा आणि 32 टक्के एलपीजी गरजांचा स्त्रोत असल्याने भारताच्या ऊर्जा सुरक्षेचा हा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे, असे वेदांताने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :