(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Go Airlines IPO: 'गो एअरलाइन्स'ला कोरोनाचा फटका, 3600 कोटींच्या IPOवर बंदी
Go Airlines IPO: ओमायक्रॉनच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर गो एअरलाईन्सने आपल्या IPOवर तात्पुरती बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे.
IPO News : कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेने देशातील अनेक क्षेत्रांना पुन्हा एकदा प्रभावित करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून नुस्ली वाडिया समूहाने (Nusli Wadia Group)आपली बजेट एअरलाइन असलेल्या 'गो एअरलाइन्स'च्या 3,600 कोटी रुपयांचा IPO आणण्याच्या योजनेवर तात्पुरती बंदी घातली आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, ग्रुपशी संबंधित अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे.
कंपनी ओमायक्रॉनच्या साथीच्यामुळे परिस्थितीचे मूल्यांकन करत असून आयपीओबद्दल बँकर्सशी चर्चा सुरु असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. याबाबत बँकर्सना प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे
3,600 कोटींचा IPO
गो एअरलाइन्स (इंडिया) ने गेल्या वर्षी मे महिन्यात आयपीओसाठी अर्ज केला होता आणि ऑगस्टमध्ये बाजार नियामक सेबी कडून मंजुरीही मिळाली होती. 3,600 कोटी रुपयांच्या पब्लिक इश्यूव्यतिरिक्त, कंपनी प्री IPO प्लेसमेंटद्वारे अतिरिक्त 1,500 कोटी रुपये उभारण्याचा विचार करत होती.
IPO लवकरच, तज्ज्ञांची अपेक्षा
ओमायक्रॉन हा कोरोनाचा प्रकार जास्त काळ टिकण्याची शक्यता कमी असल्याने गो एअरलाइन्सचा आयपीओ लॉन्च होण्यास फारसा विलंब होणार नाही, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.
विमान वाहतूक क्षेत्रावर बाजारात तेजी
नाव न सांगण्याच्या अटीवर एका फंड मॅनेजरने याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जरी हा विषाणू प्राणघातक असला तरी त्याचा प्राणघातक परिणाम कमी दिसतो. त्यामुळे येत्या आठवड्यात तिसरी लाट शिगेला पोहोचेल आणि त्यानंतर ती संपेल अशी अपेक्षा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “राज्य सरकारांद्वारे प्रवास आणि सुरक्षा प्रोटोकॉलशी संबंधित नियमांच्या अंमलबजावणीमुळे योजना पुढे ढकलल्या जात आहेत. मात्र व्यवसायावर फार काळ परिणाम होणार नाही, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. हवाई वाहतूक क्षेत्र मीडियम ते लॉन्ग टर्म बुलीश आहे."
महत्त्वाच्या बातम्या :
- अदानी आणि रामदेव बाबांच्या कंपनीचा IPO येणार, या महिन्यात कमाईची उत्तम संधी
- Dearness Allowance : केंद्रीय कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांचा थकलेला महागाई भत्ता लवकरच मिळणार, जाणून घ्या सविस्तर बातमी
- Bitcoin, Dogecoin, Ether यासह अनेक बड्या क्रिप्टोकरन्सीच्या किंमती पडल्या, जाणून घ्या आजच्या किंमती