Davos Agenda 2022 : WEF ची दावोस आर्थिक परिषद 17 जानेवारीपासून, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधन
World Economic Forum : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणारी दावोस परिषद ही 17 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाग घेणार आहेत.
![Davos Agenda 2022 : WEF ची दावोस आर्थिक परिषद 17 जानेवारीपासून, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधन Davos Agenda 2022 World Economic Forum Annual Virtual Summit on 17 21 January Know PM Modi Speech Date Time Davos Agenda 2022 : WEF ची दावोस आर्थिक परिषद 17 जानेवारीपासून, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/14/aad9b17aa316cd457531909e4dd87317_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Davos Agenda 2022 : जगभरातल्या देशांसाठी आणि उद्योगपतींसाठी महत्त्वाची असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेचे या वर्षी ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार आहे. ही परिषद 17 जानेवारीपासून सुरू होणार असून पाच दिवस चालणार आहे. या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाग घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजेरी लावणार असून ते 17 जानेवारीला संध्याकाळी चार ते साडे चार वाजण्याच्या दरम्यान संबोधन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यतिरिक्त या परिषदेला जगभरातील इतर नेतेही उपस्थिती लावणार आहेत. या वर्षीच्या परिषदेचा विषय हा 'जागतिक परिस्थिती' असा आहे.
जगभरात कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता या वर्षी प्रत्यक्ष परिषदेचे आयोजन रद्द करण्यात येत असून ते व्हर्च्युअली पद्धतीने आयोजित करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. भारतासाठी ही परिषद अत्यंत महत्त्वाची आहे.
काय आहे दावोस परिषद?
दावोस हे स्वित्झर्लंडमधील लँड वासर नदीच्या काठावर वसलेलं सुंदर खेडं आहे. हे गाव स्विस आल्प्स पर्वताच्या प्लेसूर आणि अल्बुला या पर्वतरागांनी वेढलेलं आहे. या गावाची लोकसंख्या केवळ अकरा हजार इतकी आहे. युरोपमधील सर्वात उंचीवर वसलेलं हे ठिकाण आहे.
दावोसमध्ये दरवर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात येते. या बैठकीसाठी जगभरातील बडे नेते आणि उद्योगपती आपली उपस्थिती लावतात. दरवर्षी या बैठकीत जवळपास 2500 व्यक्ती सहभाग घेतात.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना 1971 साली करण्यात आली होती. या संस्थेचं मुख्यालय स्वित्झर्लंडची राजधानी जीनेव्हामध्ये आहे. या संस्थेच्या माध्यमातून जागतिक व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील व्यक्ती एकत्र येतात आणि जागतिक विकासाला चालना देण्यासंबंधी धोरण निश्चित करतात. पाच दिवस चालणाऱ्या या बैठकीत व्यापार, राजकारण, कला, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील बड्या व्यक्ती सहभाग घेतात.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)