Share Market : Sensex आणि Nifty मध्ये अंशत: घसरण; IT, कॅपिटल गुडस्, रिअॅलिटी क्षेत्रातले शेअर्स वधारले
Share Market : शेअर बाजार सुरु झाल्यापासूनच बाजारात चढ-उतार दिसून आली. आज सेन्सेक्समध्ये 12 अंकांची घसरण झाली.
![Share Market : Sensex आणि Nifty मध्ये अंशत: घसरण; IT, कॅपिटल गुडस्, रिअॅलिटी क्षेत्रातले शेअर्स वधारले Closing Bell Share Market Market ends flat amid volatility IT realty capital goods gain auto drags Share Market : Sensex आणि Nifty मध्ये अंशत: घसरण; IT, कॅपिटल गुडस्, रिअॅलिटी क्षेत्रातले शेअर्स वधारले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/27/bd66186ad9e0488d9ccf37fad7d03b54_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारमधील सुरु असलेल्या तेजीला काहीसा लगाम लागल्याचं दिसून आलंय. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये 12.27 अंकांची घसरण झाली तर निफ्टीमध्ये 2 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये 0.02 टक्क्यांची घसरण होऊन तो 61,223.03 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.01 टक्क्यांची घसरण होऊन तो 18,255.80 वर पोहोचला आहे. आज 1919 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1297 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 76 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना आयटी, रिअॅलिटी सेक्टर आणि कॅपिटल गुडस् च्या शेअर्समध्ये एक टक्क्यांपर्यंतची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे तर ऑटो, फार्मा, बँक आणि एफएमजीसी सेक्टर्सच्या शेअर्सची विक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे.
गुरुवारी शेअर बाजारात Tata Consumer Products, IOC, TCS, Infosys आणि L&T या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली असून Asian Paints, Axis Bank, UPL, HUL आणि ONGC या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- TATA Cons. Prod- 4.42 टक्के
- TCS- 1.80 टक्के
- IOC- 1.77 टक्के
- Infosys- 1.72 टक्के
- Larsen- 1.31 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Asian Paints- 2.66 टक्के
- Axis Bank- 2.57 टक्के
- HUL- 2.09 टक्के
- UPL- 1.94 टक्के
- ONGC- 1.77 टक्के
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)